घरठाणेइमारतीच्या एका मजल्यावर रुग्ण आढळल्यास सर्वांची कोरोना चाचणी; ठाणे महापालिका सतर्क

इमारतीच्या एका मजल्यावर रुग्ण आढळल्यास सर्वांची कोरोना चाचणी; ठाणे महापालिका सतर्क

Subscribe

राज्यभरात कोरोना रुग्णांच्या (Corona Patients) संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबई, ठाणे, पालघर परिसतील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

राज्यभरात कोरोना रुग्णांच्या (Corona Patients) संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबई, ठाणे, पालघर परिसतील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या लसीकरणामध्येही वाढ केली आहे. आरोग्यमंत्र्यांच्या माहितीनंतर मुंबई महापालिकेने (BMC) सतर्कतेचा इशारा दिला. त्यानंतक आता ठाणे महापलिकाही (TMC) सतर्क झाली आहे. (Covid Test in Buildings Thane Municipal Corporation Commissioner Bipin Sharma)

कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आता ठाण्यातील इमारतीच्या एकाद्या मजल्यावर कोरोना रुग्ण आढळल्यास त्या मजल्यावरील सर्व रहिवाशांच्या चाचण्या (Corona Test) करण्यात येणार आहेत. याबाबत आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आदेश दिले आहेत. त्यानंतर आरोग्य विभागाने मंगळवारी सकाळपासूनच प्रक्रियेला सुरूवात केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईच्या ‘या’ परिसरात कोरोना रूग्णाच्या संख्येत वाढ

ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण माजिवडा मानपाडा क्षेत्रात सापडत आहेत. म्हणजेच, घोडबंदर भागातील उच्च मध्यमवर्गीय तसेच उच्चभ्रू वसाहतीमध्ये अधिकाधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन चाचण्या वाढविण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोना, मंकीपॉक्स, टोमॅटो फ्लू, मर्सपासून ते Norovirus पर्यंत; जगभरात ‘या’ 8 व्हायरसचा कहर

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सोमवारी संध्याकाळी डॉ. शर्मा यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या सूचना दिल्या होत्या. या बैठकीत उपायुक्तांसह स्थानिक पातळीवर कार्यरत असलेले सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. लसीकरणात हरघर दस्तक ही मोहीम प्रभावीपणे राबवीत असताना आता घरोघरी जाऊन चाचण्या सुरू करण्याचे बैठकीत ठरले आहे.


हेही वाचा – राज्यातील सहा जिल्ह्यांत कोरोनाचा धोका वाढला, मास्कबाबत टोपेंनी केले महत्त्वाचे विधान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -