घरताज्या घडामोडीLive Updates: सीएसटीतून जप्त केलेल्या मर्सिडीज कारमध्ये सापडले पाच लाख

Live Updates: सीएसटीतून जप्त केलेल्या मर्सिडीज कारमध्ये सापडले पाच लाख

Subscribe

एनआयएच्या पथकाने मंगळवारी सीएसटी परिसरातून हस्तगत करण्यात आलेली मर्सिडीज या कार मधून पाच लाखा पेक्षा अधिक रक्कम आणि वोट काउंटिंग मशीन, काही कपडे आणि स्कॉर्पिओ गाडीचे दोन नंबरप्लेट जप्त करण्यात आले असल्याची माहिती एनआयए चे महासंचालक अनिल शुक्ला यांनी दिली आहे. मर्सडीझ बेंज या गाडीचा मालक धुळे जिल्ह्याचा आहे, मात्र त्याने ती गाडी विकली होती ती कुणाला विकली या बाबत तपास सुरू आहे.


पोलीस महासंचालक हेमंत नगराळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

- Advertisement -

पोलीस महासंचालक हेमंत नगराळे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा येथील निवासस्थानी गेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परवहन मंत्री अनिल परब यांच्यात महत्त्वाची बैठक सुरु आहे. पोलीस आयुक्त परमबीर सिंह देखील वर्षा बंगल्यावर काही वेळापूर्वी पोहोचले आहेत.


राज्यात कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. कोरोनामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. आज ९,५१० करोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर राज्यात आजपर्यंत एकूण २१,५४,२५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.७७ % एवढे झाले आहे. (सविस्त वाचा – राज्यात २४ तासात १७,८६४ नवीन कोरोना रुग्णांचे निदान)

- Advertisement -

मुंबईत मागील २४ तासात १९२२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासात ४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत एकूण १२३६ कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. (सविस्त वाचा – Mumbai Corona Update: मुंबईत १ हजार ९२२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, १,२३६ रुग्णांची कोरोनावर मात)


वाझे प्रकरणामुळे सरकरावर कोणताही परिणाम होणर नाही. वाझे प्रकरणावर राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा तपास करत आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही दुमत नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे. (सविस्तर वाचा – Ambani Scorpio case : पवारांची CM, गृहमंत्र्यांना शाबासकी, तर महाविकास आघाडीत मतभेद नसल्याचा खुलासा)


मुंबईतल्या गोरेगाव खडकपाडा येथे भीषण आग लागली आहे. लाकडाच्या वखारी आणि झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि ७ जंबो टँकर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. लाखडाची वखार आणि बाजूला झोपडपट्टी असल्याने ही आग जोरात पसरते आहे.


केरळचे ज्येष्ठ नेते पीसी चाको यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थित पीसी चाको यांचा राष्ट्रवादीत प्रवेश


नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी परिसरात एका खासगी कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीत कंपनी खाक झाली आहे. कंपनीत लागलेली आग ही शॉक सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.


सीएसटी येथील पार्किंग लॉट मधून एनआयएने मर्सडीझ कार घेतली ताब्यात

या कार मध्ये मनसुख हिरेन आणि वाझे यांची सीएसटी ला भेट झाली होती, ज्या दिवशी मनसुख ची स्कॉर्पिओ कार विक्रोळी येथे खराब झाली होती त्याच दिवसाची ही घटना असल्याची माहीती मिळत आहे. मनसुख हिरेन हा ओला कॅब मधून क्रॉफर्ड मार्केट येथे येत असताना त्याने आपले लोकेशन बदलून सीएसटी येथे उतरला होता.


महाराष्ट्र हे कायदा व सुव्यवस्थेचे राज्य आहे. कितीही मोठी व्यक्ती असली तरी कायद्याने कारवाई केली जाईल. राज्यातील मोठ्या बदलांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार योग्य निर्णय घेतील असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. दिल्लीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात बैठक पार पडली तब्बल अर्ध्या तासापासून ही बैठक सुरु होती. एका कार्यक्रमासाठी शरद पवारांना निमंत्रण देण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.


पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी १७ एप्रिलला मतदान होणार आहे. या मतदानाचा निकाल २ मे २०२१ रोजी लागेल. भारत भालकेंच्या निधनानंतर जागा रिक्त आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. भारत भालके हे राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती.


सचिन वाझे प्रकरणावर दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या महत्त्वाची बैठक सुरु आहे. सचिन वाझे प्रकरणावर चर्चा सुरु असल्याची माहिती समजते आहे.


शर्जिल उस्मानी आला, जबाब देऊन गेला, उद्धवजी सत्तेसाठी किती लोकांना वाचवणार – फडणवीस

आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले, ‘शार्जिल उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणणार म्हणजे आणणारच’ प्रत्यक्षात काय, तो येऊन गेला, जबाब देऊन गेला. आणि महाविकास आघाडी सरकारने प्रत्यक्षात काय केले असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे. (सविस्तर वाचा – शर्जिल उस्मानी आला, जबाब देऊन गेला, उद्धवजी सत्तेसाठी किती लोकांना वाचवणार – फडणवीस)


आयोगाने मराठा समजाचे मागासलेपण उघड केलं – चंद्रकांत पाटील

आपल्याला मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवता येत नाही हे अपयश झाकण्यासाठी केविलवाणी धडपड सुरु आहे. असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परीषद घेत मराठा आरक्षणाबाबत काही पैलू मांडले आहेत. (सविस्त वाचा – मराठा आरक्षण टिकवता येत नाही म्हणून राज्य सरकारची धडपड, चंद्रकांत पाटील यांचा आरोप)


विरोधकांनी विरोधक म्हणून काम करावं, असा सल्ला जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला दिला आहे. राष्ट्रपती राजवट लावणे काही सोपं नाही, विरोधकांना आता सत्ता हवी आहे, असं जयंत पाटील म्हणाले.


सचिन वाझे प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. चौकशीनंतर योग्य कारवाई केली जाईल. सरकार कुणालाही पाठिशी घालणार नाही. दोषींवर कारवाई केली जाईल. सचिन वाझे प्रकरणी मुख्यमंत्री निर्णय घेतील. महाविकासआघडीच्या पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं.


वर्षा बंगल्यावर महाविकास आघाडीची महत्वाची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अनिल परब, अजित पवार, जयंत पाटील, बाळसाहेब थोरात उपस्थित आहेत. सचिन वाझे प्रकरणी चर्चा होत असल्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस आयुक्त बदलण्याची शक्यता आहे.


देशात गेल्या २४ तासांत २४ हजार ४९२ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २० हजार १९१ रुग्ण बरे झाले आहेत. १३१ जणांचा मृत्यू गेल्या २४ तासांत झाला. भारतात सध्या १ कोटी १४ लाख ९ हजार ८३१ सक्रिय रुग्ण आहेत. तर २ लाख २३ हजार ४३२ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ कोटी २९ लाख ४७ हजार ४३२ जणांना लस देण्यात आली आहे.


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे औरंगाबाद प्रशासन अॅक्शन मोडवर आहे. खासगी रुग्णालयांनी बेडची संख्या वाढवावी,अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. शहरातील नामांकित रुग्णालयांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.


कोरोना काळात शाळा बंद पडल्यामुळे तेलंगणा राज्याच्या वारांगना मधील एका शाळेतील नृत्य शिक्षकांने चक्क चक्क गांजाची तस्करी सुरु केली. नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांनी या शिक्षकाला गांजा तस्करी करत असताना नागपुरात अटक करण्यात आली आहे. १३ लाख किमतीचा ९१ किलो गांजा आणि पाच लाख रुपये किंमतीची गाडी जप्त करण्यात आली आहे.


कोरोना प्रतिबंध नियम न पाळणाऱ्या पुण्यातील ४ हॉटेल्सवर पुणे पोलिसांनी कारवाई केली. क्षमतेपेक्षा जास्त लोकांना हॉटेल मध्ये प्रवेश देणे, सोशल डिस्टसींगचे नियम न पाळणे यासाठी कारवाई करण्यात आली आहे. हॉटेल मर्फीज, हॉटेल टल्ली, हॉटेल द डेली, हॉटेल पब्लिक अशी या चार हॉटेल्सची नावं आहेत. हॉटेल व्यवस्थापक व मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चारही हॉटेल कोरेगाव पार्क परिसरातील आहेत.


नाशिक जिल्हा परिषदेच्या ४० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ४ दिवसात ४० हुन अधिक जणांना लागण झाली. नाशिकमध्ये लसीकरण केंद्र वाढवण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांनी सीईओृना पत्र पाठवलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -