चोर मचाये शोर, ज्यांच्याकडे गृह विभाग त्या राष्ट्रवादीचे पाहा नवाब – आशिष शेलारांची खोचक टीका

अन्याय झालेल्या करुणा शर्मा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला निघाल्या तर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन फसवण्यात आले.

Cruise Drug Bust ashish shelar criticize on nawab malik drug case
चोर मचाये शोर, ज्यांच्याकडे गृह विभाग त्या राष्ट्रवादीचे पाहा नवाब - आशिष शेलारांची खोचक टीका

एनसीबी अधिकाऱ्यांनी केलेल्या क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. एनसीबीच्या कारवाईमध्ये भाजपचे कार्यकर्ते मदत करत असल्यावरुन एनसीबीच्या कारवाईरुन भाजपवर निशाणा साधला होता. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यांच्याकडे गृह विभाग त्या राष्ट्रवादीचे हे पाहा असे नवाब असे म्हणत शेलारांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. भ्रष्टाचाराची तक्रार करायला निघाले तर त्यांना खोट्या नोटीस बजावण्यात येत आहे. पोलिसांकडून नेत्यांना दौरा करण्यापासून रोखण्यात येत असल्यावरुनही आशिष शेलारांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करुन राष्ट्रवादी काँग्रेसवर एनसीबी कारवाईवरील आरोपांवरुन हल्लाबोल केला आहे. शेलार यांनी म्हटलं आहे की, अन्याय झालेल्या करुणा शर्मा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला निघाल्या तर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन फसवण्यात आले. भाजप नेते किरीट सोमय्या भ्रष्टाचाराची तक्रार करायला निघाले तर त्यांना खोट्या नोटीस बजावल्या आणि पोलिसांकडून रोखण्यात आले असल्याचेही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

एनसीबीच्या कारवाईमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून ड्रग्ज प्रकरणातील कारवाईमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी एनसीबीला कायदेशीर मदत केली आहे. परंतु राष्ट्रवादीचे नेते मनीष भानुशालींच्या नावाने थयथयाट करत असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. यावरुन चोर मचाये शोर आणि ज्यांच्याकडे गृह विभाग त्या राष्ट्रवादीचे पाहा असे नवाब असं म्हणत शेलारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर खोचक टीका केली आहे.

नवाब मलिकांचा आरोप काय?

क्रूझवरुन आर्यन खानला अटक करणारा एनसीबीचा अधिकारी केपी गोसावीचा एक सेल्फी फोटो व्हायरल झाला होता. यानंतर एएनआयने दिल्लीच्या एनसीबीने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगितले की, हा एनसीबीचा अधिकारी नाही. तसेच या अधिकाऱ्याचा आणि एनसीबीचा काहीही संबंध नाही. मग ही व्यक्ती कोण असा सवाल उपस्थित होत आहे. जर तो व्यक्ती अधिकारी नाही तर आर्यन खानला कसा ओढून नेऊ शकतो? हे एनसीबीने स्पष्ट करावे असे मलिक यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : कारवाई कायद्याच्या चौकटीत राहूनच, नवाब मलिकांच्या आरोपावर समीर वानखेडेंचं स्पष्टीकरण