मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्याची घटना; महामार्गावर वाहनांची वाहतूक कोंडी

शनिवारी रात्री १०: ३० च्या सुमारास परशुराम घाटातील काही भागात मातीचा डोंगर रस्त्यावर आला होता

गेल्या २४ तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळल्याची बातमी समोर आली आहे. दरम्यान या घाटातील वाहतूक सध्या बंद करण्यात आली आहे. सध्या या घटनास्थळी संबंधित ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी सुद्धा पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहेत. तसेच आता वाहतूक लोटे चिरणी कळबस्ते मार्गे वळवण्यात आली असून महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.

या घाट परिसरात पाऊस चालू झाल्यापासूनच किरकोळ दरड कोसळ्याच्या घटना घडत होत्या. शनिवारी रात्री १०: ३० च्या सुमारास परशुराम घाटातील काही भागात मातीचा डोंगर रस्त्यावर आला होता. ही गोष्ट नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधित ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तत्काळ या ठिकाणाची पहाणी केली, तसेच पोलिसही या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर या महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली.

परशुराम घाटात दरड हटवण्याचे काम सुरू
उपस्थित ठेकेदाराने परशुराम घाटात दरड हटवण्याचे काम सुरू केले असून आता रस्त्यावरची माती पूर्णपणे बाजूला करून रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करण्यात आला आहे.

परशुराम घाटात वारंवार असे प्रकार होत असल्याने मोठी हानी लक्षात घेत एप्रिल आणि महिन्यात हा घाट काही काळासाठी बंद करण्यात आला होता. कारण पावसाळ्यात एखादा मोठा दगड घाटा कोसळून नये म्हणून त्यावेळी घाटामध्ये डोंगरकटाई करण्यात आली होती.


हेही वाचा :उद्यापासून महाराष्ट्रात पावसाची हजेरी; पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही मुसळधार पाऊस