घर ताज्या घडामोडी सेक्सटॉर्शनविरोधात राज्यात कडक कायदा आणणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

सेक्सटॉर्शनविरोधात राज्यात कडक कायदा आणणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

Subscribe

ट्रायल कोर्टातला दोषसिद्धीचा दर हा चांगला आहे. पण सेशन ट्रायबल जे आहेत यामधील दोष सिद्धीचा दर सुधरवण्याची आवश्यकता आहे, हे आपण मान्य केलं पाहीजे. लोक अदालतीमध्ये ज्या केसेस निकाली निघतात, अशा केसेस सुद्धा आपल्या रेट ऑफ कनव्हिक्शनवर परिणाम करतात. त्यामुळे रेट ऑफ कनव्हिक्शन वाढवण्यासंदर्भात राज्य सरकारने योग्य भूमिका घेतली आहे. सेक्सटॉर्शन आणि अवैद्य धंद्यातले विषयही समोर आले आहेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बोलताना सेक्सटॉर्शनविरोधात राज्यात कडक कायदा आणणार असल्याचं सांगितलं आहे. सेक्सटॉर्शनचा एक नवीन प्रकार लक्षात आला आहे. मध्यंतरीच्या काळात पुण्यात एक धक्कादायक घटना घडली. सेक्सटॉर्शनमुळे दोन मुलांनी आत्महत्या केली. ज्यावेळी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आपण केली, त्यावेळी असं लक्षात आलं की, राजस्थानमधील एक गावं हेच काम करतंय. त्या गावात पुरुष आणि महिलांनी कम्प्यूटर घेतले आहेत. तिथून लोकांची फसवणूक करायची आणि मग त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे. पैसे देता येत नाहीत म्हणून काही लोकांनी लाजेपोटी आत्महत्या केल्या. हे प्रकरण समोर आल्यानंतर आपण त्यामध्येही अटक केली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

येत्या काळात सेक्सटॉर्शन संदर्भातील काही गुन्हे किंवा अशा प्रकारचे जे रॅकेट तयार करण्यात आलेत. या रॅकेटला चाप बसावा म्हणून सेक्सटॉर्शनविरोधात राज्यात कडक कायदा आणण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. त्याचप्रमाणे सायबर क्राईम रोखण्यासाठी आम्ही पाऊलं उचलतोय, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्यातील ९५ टक्के महिलांसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये जवळची लोकं होती. तर लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारांसंदर्भातील ९९ टक्के गुन्हे उघडकीस आणले. ऑपरेशन मुस्कानमुळे ३७ हजार ५११ बेपत्ता मुलांना घरी पाठवण्यात यश आलं, असंही फडणवीस म्हणाले.


- Advertisement -

हेही वाचा : राज्यपालांच्या विरोधात अनोखे आंदोलन, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांची घोषणाबाजी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -