घरताज्या घडामोडी... तोवर लग्न करणार नाही, विधान परिषदेत खडसे-फडणवीस आमनेसामने

… तोवर लग्न करणार नाही, विधान परिषदेत खडसे-फडणवीस आमनेसामने

Subscribe

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक हे आमने-सामने आले. विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा सामना सुरू असताना, दु सरीकडे विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस हे आमने-सामने भिडले. यावेळी विधान परिषदेत एकनाथ खडसे यांनी फडणवीसांबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं.

विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असं वक्तव्य करत एकनाथ खडसेंनी फडणवीसांना आठवण करून दिली. विदर्भ वेगळा झाला पाहीजे, असा लढा देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी सुरू केला. यावर अनेक भाषणं देखील करण्यात आली. विदर्भ वेगळा झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही, ही भूमिका कठोर भीष्मप्रतिज्ञा आमच्या देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. फडणवीसांची ती भीष्मप्रतिज्ञा कुठेय?, असा सवाल एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला.

- Advertisement -

खडसेंच्या या वक्तव्याचा देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेतला. आमच्या नाथाभाऊंनी एक नवा शोध लावला की, मी असं काही बोललोच नव्हतो. अहो नाथाभाऊ माझ्या लग्नात तुम्ही आला होतात. तेव्हा तुम्ही आमचे नेते होतात. मी जर अशी काही घोषणा वगैरे केली असती तर तुम्ही थांबवलं असतं ना माझं लग्न.., एक जागा दाखवा जिथे मी घोषणा केली. काही वृत्तपत्र काहीही छापतात त्यावर विश्वास ठेवू नका, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंना दिलं.


हेही वाचा : समृद्धी महामार्गानंतर अजून एक प्रकल्प विदर्भासाठी गेमचेंजर ठरणार, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -