Eco friendly bappa Competition
घर ठाणे कल्याण - तळोजा मेट्रो मार्गाच्या कामाला गती द्या, खासदार श्रीकांत शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे...

कल्याण – तळोजा मेट्रो मार्गाच्या कामाला गती द्या, खासदार श्रीकांत शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Subscribe

या मेट्रो मार्गामुळे ठाणे शहरातला प्रवासी भिवंडी ते कल्याण आणि कल्याण येथील प्रवासी थेट तळोजा आणि नवी मुंबईला जोडला जाणार आहे. त्यामुळे या मार्गाच्या उभारणीला महत्व प्राप्त झाले आहे.

डोंबिवली – कल्याण – तळोजा या मेट्रो १२ मार्गाच्या कामाला गती देण्याची आग्रही मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. हा मार्ग ठाणे – भिवंडी – कल्याण या मेट्रो मार्गाचा हा विस्तारित मार्ग असून यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीणचा भाग आणि तळोजा हे थेट एकमेकांना जोडले जावून त्याचा नागरी वस्तीसह ग्रामीण भागालाही फायदा होणार आहे.

हेही वाचा रांगेपासून सुटका! दिवा स्थानकात अतिरिक्त आठ नवीन एटीव्हीएम मशिन्स दाखल

- Advertisement -

एमएमआरडीएच्या माध्यमातून मुंबई आणि उपनगरात विविध मेट्रो मार्गांची उभारणी केली जाते आहे. या मार्गांमुळे प्रवास सुखकर झाला आहे. तर विविध मार्गांवर येत्या काळात प्रवास सोयीचा आणि जलद होणार आहे. ठाणे – भिवंडी – कल्याण या मेट्रो मार्गाचा विस्तारीत भाग असलेल्या कल्याण – डोंबिवली – तळोजा ( मेट्रो १२) या मार्गालाही मंजुरी देण्यात आली आहे. या मेट्रो मार्गामुळे ठाणे शहरातला प्रवासी भिवंडी ते कल्याण आणि कल्याण येथील प्रवासी थेट तळोजा आणि नवी मुंबईला जोडला जाणार आहे. त्यामुळे या मार्गाच्या उभारणीला महत्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचा – अवघ्या १२ मिनिटांत दहिसर ते मीरा रोड प्रवास, वाहतूक कोंडीच्या समस्येतून होणार सुटका

- Advertisement -

एकूण २०.७५ किमीच्या या मार्गात १७ स्थानके नियोजित करण्यात आली आहेत. कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून हा मार्ग सुरू होणार असून पुढे डोंबिवलीतील विविध गावे आणि मानपाडा मार्गे कल्याणच्या ग्रामीण भागातून हा मेट्रो मार्ग जाणार आहे. तळोजा हे या मार्गातील अंतिम स्थानक आहे. या मार्गामुळे शहरी भागासह ग्रामीण भागही मेट्रोला जोडला जाणार आहे. या प्रकल्पासाठी यापूर्वीच सल्लागार समितीची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला गती देण्यासाठी सल्लागार समितीला तातडीचे योग्य ते निर्देश द्यावेत आणि कामाला सुरुवात करावी, अशी मागणी  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisment -