घरमहाराष्ट्रभीमा कोरेगाव प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात निर्णय

भीमा कोरेगाव प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात निर्णय

Subscribe

भीमा कोरेगाव प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज अंतिम सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात गेल्या वर्षभरापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज अंतिम सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात गेल्या वर्षभरापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भीमा कोरेगाव विजय स्तंभ आयोजनाच्या मुद्यावरून जवळपास १० जणांना आतापर्यंत तुरुंगात डांबण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या या कारवाईला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. या सुनावणीला एक वर्ष उलटून गेल आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. भीमा कोरेगाव प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्या आली होती. परंतू त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले नाहीत. आरोपपत्र दाखल होत नसतानाही त्यांना अटक का? त्यामुळे त्यांना जामीन मिळावा, अशी मागणी करत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर गेल्या महिन्याच सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती.

काय आहे प्रकरण

भीमा कोरेगावच्या वर्षभरापूर्वीच्या घटनेने महाराष्ट्राचच नव्हे तर देशाचं वातावरण ढवळून निघालं. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न समाकंटकांनी केला. राजकीय आरोप प्रत्यारोप झाले आणि प्रत्येकजण आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. या राजकीय साठमारीत समाजाची विण उसवली गेली. या वर्षाच्या सुरवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात सुरू झालेल्या या क्रिया-प्रतिक्रिया अजूनही थांबायला तयार नाहीत. गेल्या वर्षी १ जानेवारी २०१८ रोजी या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली होती. त्यातही एकाच मृत्यू झाल तर सरकारी मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -