दीपक केसरकर लायकीपेक्षा जास्त बोलू नका, नाही तर…; राणेंच्या धमकीनंतर युतीत पडणार वादाची ठिणगी

नाही तर आम्ही काय गप्प बसणार नाही, असा धमकीवजा इशाराच भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नीलेश राणेंनी दिला आहे. नीलेश राणेंनी ट्विटवर व्हिडीओ शेअर करत दीपक केसरकरांना हा इशारा दिला आहे.

deepak kesarkar
deepak kesarkar

मुंबईः दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकीपेक्षा जास्त बोलू नका, असं म्हणत तुमची लायकी आम्हाला चांगली माहीत आहे. दीपक केसरकर कशाला उड्या मारत आहात, तुमची मतदारसंघातील अवस्था काय आहे ती, तुम्हाला कुबड्या मिळाल्यात त्या कुबड्यांवर चाला. नाही तर मतदारसंघातून तुमचा विषय आटपला होता. तुम्हाला दुसरं राजकीय जीवनदान मिळालं आहे. हे विसरू नका आणि इज्जत मिळते ती घ्यायला शिका. नाही तर आम्ही काय गप्प बसणार नाही, असा धमकीवजा इशाराच भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नीलेश राणेंनी दिला आहे. नीलेश राणेंनी ट्विटवर व्हिडीओ शेअर करत दीपक केसरकरांना हा इशारा दिला आहे.

दीपक केसरकर कुठे तरी बोललेत राणेंची दोन्ही मुलं लहान आहेत. त्यांना समज देण्याची गरज आहे. दीपक केसरकर आपण युतीमध्ये आहोत. विसरू नका. जेवढी युती टिकवायची जबाबदारी आमच्यावर आहे, तेवढी तुमच्यावरही आहे. तुम्ही शिंदेंच्या गटाचे प्रवक्ते असू शकता, आमचे नाही. तुमची अवस्था आम्ही मतदारसंघात काय केलीय हे आम्हाला माहीत आहे, असं म्हणत नीलेश राणेंनी दीपक केसरकरांवर हल्ला चढवलाय.


राणेंच्या याच दोन मुलांनी तुमची नगरपालिका तुमच्याकडून घेतली. भारतीय जनता पक्ष आज तिकडे आहे. जिल्हा परिषद आमच्याकडे आहे. पंचायत समिती सदस्य तुमच्या मतदारसंघातले आमच्याकडे आहेत. अनेक ग्रामपंचायती आमच्याकडे आहेत. तुमची लायकी आम्हाला चांगली माहीत आहे. दीपक केसरकर कशाला उड्या मारत आहात, तुमची मतदारसंघातील अवस्था काय आहे ती, तुम्हाला कुबड्या मिळाल्यात त्या कुबड्यांवर चाला. नाही तर मतदारसंघातून तुमचा विषय आटपला होता. तुम्हाला दुसरं राजकीय जीवनदान मिळालं आहे. हे विसरू नका आणि इज्जत मिळते ती घ्यायला शिका. नाही तर आम्ही काय गप्प बसणार नाही, असं म्हणत त्यांनी केसरकरांवर निशाणा साधलाय.

ज्या भाषेत तुम्ही सांगाल त्या भाषेत उत्तर देण्याची आमची तयारी आहे. पण वातावरण खराब करू नका. जबाबदारी आपल्या दोघांवर आहे विसरू नका, आपण एका युतीमध्ये आहोत. नवीन नवीन तुम्ही मीडियासमोर बोलायला लागलेले आहात, पण तुम्हाला सगळं काही आलेलं नाही. ते शिकून घ्या, कोणाला काय बोलायचं हे अगोदर विचारून घ्या आणि मगच तोंड उघडा एवढं लक्षात ठेवा, असंही ते म्हणालेत.


हेही वाचाः १५ जुलैपासून १८ वर्षांपुढील नागरिकांना बुस्टर डोस मोफत