घरठाणेमुंब्रा ते डोंबिवली रेल्वेरुळ समांतर रस्त्याची मागणी, पण सामंतांनी दिला दुसराच पर्याय

मुंब्रा ते डोंबिवली रेल्वेरुळ समांतर रस्त्याची मागणी, पण सामंतांनी दिला दुसराच पर्याय

Subscribe

Raju Patil | राज्य सरकारने दिलेल्या उत्तरात हा पर्यायच शक्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे रेल्वे रुळांना समांतर रस्ता पुन्हा प्रस्तावित करून डोंबिवली ते मुंब्रावासियांना दिलासा मिळणार का असा प्रश्न राजू पाटील यांनी आज उपस्थित केला.

नागपूर – रस्तेमार्गे मुंब्र्यातून डोंबिवलीत पोहोचण्यासाठी तासभराचा कालावधी लागतो. मात्र, मुंब्रा, दिवा, कोपर आणि डोंबिवली रेल्वे रुळांना समांतर रस्ता केल्यास हा प्रवास अवघ्या पाच मिनिटांत होणार आहे. त्यामुळे या प्रस्तावाचा विचार केला जावा, अशी मागणी कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांनी आज विधानसभेत केली. मात्र, रेल्वे रुळांना समांतर रस्ता फिजिबल नसल्याचं कारण देत मोठागावा डोंबिवली पश्चिम ते माणकोली जुना राष्ट्रीय महामार्ग तीन या पर्यायावर काम सुरू असल्याची माहिती मंत्री उदय सांमत यांनी केली.

मुंब्रा ते डोंबिवली दरम्यान कल्याण शिळफाट्याला प्रचंड ट्राफिक असते. या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचा अर्धाअधिक वेळ वाहतूककोंडीत जातो. त्यामुळे कल्याण शिळफाट्यावरील वाहतूककोंडी कमी व्हावी यासाठी रेल्वे रुळांना समांतर रस्त्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २००७ साली आमदार असताना डोंबिवलीचे तत्कालीन आमदार हरिश्चंद्र पाटील यांनीही अशी मागणी होती. आताही या रस्त्याचा पर्याय सुचवण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनेही या प्रस्तावाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यासाठी ६९१ कोटींचा डीपीआरही मंजूर झाला आहे. मात्र, राज्य सरकारने दिलेल्या उत्तरात हा पर्यायच शक्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे रेल्वे रुळांना समांतर रस्ता पुन्हा प्रस्तावित करून डोंबिवली ते मुंब्रावासियांना दिलासा मिळणार का असा प्रश्न राजू पाटील यांनी आज उपस्थित केला.

- Advertisement -

उदय सामंत काय म्हणाले?

२१ डिसेंबर २००७ च्या १२० व्या बैठकीत मुंब्रा -डोंबिवली रेल्वे रुळ समांतर रस्त्याला मान्यता देण्यात आली होती. तेव्हा तो रस्ता ९३ कोटींचा होता. त्यानंतर मोनार्ज कन्सलन्टंटला सल्लागार म्हणून नेमण्यात आले. पण त्यांनी केलेल्या सर्व्हेनुसार हा रस्ता फिजिबल नाही असा अहवाल दिला. दलदलीचा मार्ग, जाण्या-येण्यासाठी सोयीचा रस्ता नाही, खासगी मालकीच्या जागा, ७५ टक्के सीआरझेडची जागा आदी विविध समस्यांमुळे हा रस्ता होऊ शकत नाही. त्यानंतर दुसऱ्या सल्लागाराचीही नेमणूक करण्यात आली. दुसऱ्या सल्लागाराने चार पर्याय सुचवले.

- Advertisement -

१. मुंब्रा ते डोंबिवली राष्ट्रीय महामार्ग तीन जुना व आठ जुना मार्ग साकीनाका कर्जत मार्गे खोपोली

२. मुंब्रा -डोंबिवली रेल्वे रुळ समांतर रस्ता

३.शिळफाटा मार्गे मुंब्रा कौसा

४. मोठागावा डोंबिवली पश्चिम ते माणकोली जुना राष्ट्रीय महामार्ग तीन

यापैकी मोठागाव डोंबिवली पश्चिम ते माणकोली राष्ट्रीय महामार्ग तीन असा पर्याय एमएमआरडीएने स्वीकारला. हा ७५ कोटींचा रस्ता आहे. तसंच, पूल बांधण्याकरता २२३ कोटींची तरतूद करण्यात आली. शिवाय, लिंक रोडचे कामही ७५ टक्के पूर्ण झाले आहे. या रस्त्याला पर्याय असणाऱ्या कल्याण बाह्यवळण रस्ता, ऐरोलीपर्यंतच्या रस्त्यांचीही कामं सुरू आहेत. पॅकेज ३ मधील माणकोली मोठागाव ते गोविंदवाडी बायपासचं टेंडर निघालं आहे. त्यामुळे या रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यावर राजू पाटील यांना अपेक्षित असलेला सोयीचा मार्ग निर्माण होईल, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी दिला.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -