घरताज्या घडामोडीकोरोनामुळे विकासकामांनां योग्य प्रमाणात निधी देता आला नाही : अजित पवार

कोरोनामुळे विकासकामांनां योग्य प्रमाणात निधी देता आला नाही : अजित पवार

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पावर रविवारी सांगलीतील विकास कामांचा आढावा घेऊन उद्धाटन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी रविवारी सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधाला.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पावर रविवारी सांगलीतील विकास कामांचा आढावा घेऊन उद्धाटन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी रविवारी सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधाला. यावेळी त्यांनी सांगलीतील विकास कामांची यादी सांगितली आणि दिवसभरातील दौऱ्यासंदर्भात माहिती दिली. शिवाय, कोरोनामुळे विकास कामांनां योग्य प्रमाणात निधी देता आला नसल्याचं त्यांनी म्हटलं.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कोरोनामुळे जसा पद्धतीने निधी विकासकामाला ज्या पटीत मिळायाला पाहिजे होता, त्या पटीत आम्ही देऊ शकलो नाही. त्याच कारण आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे देशातील केंद्र सरकारला आणि राज्यांमधील राज्य सरकारांना प्राधान्य आरोग्य सुवुधा देणं, कोरोनामधून त्या माणसाला बाहेर काढणं, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन यासारख्या बऱ्याच गोष्टींमध्ये प्राधान्य द्यावे लागले. शिवाय वॅक्सिन देणे, ऑक्सिजन प्लाण्ट उभे करणं, ऑक्सिजन कमी न पडून देणं, जम्बो हॉस्पिटल उभी करणं, इतर हॉस्पिटल्स आहेत यामधील खासगी किंवा सरकारी असतील यामध्ये सर्व सोयी उपलब्ध करणं. या संदर्भातील सर्व आढावा मी काल घेतला.”

- Advertisement -

सांगली, मिरज, कुपवाड, संदर्भात माहिती घेतली असता सांगली आणि मिरजला अंडरग्राउंड ड्रेनेज झालेलं आहे. कुपवाडला झालेलं नाही. यासंदर्भात महापौर आणि बाकीच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, हा प्रस्ताव नगरविकासाकडे आहे. त्यानंतर मी संबंधित अधिकाऱ्याशी रात्री फोनवरून बोलणं केलं. त्यावेळी त्याने सर्व प्रस्तावची चाचपणी करून नगरविकास दोन म्हणजेच मंत्रालयात पाठवतो असे त्या अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर हा प्रस्ताव नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजूर केला जाईल.”

“माझं स्वत:चं स्पष्ट मत आहे की, राज्यातील सर्व महापालिकांनी पुढाकार घ्यावा आणि पहिल्यांदा आपल्याआपल्या भागातील 100 टक्के ड्रेनेजची व्यवस्था करावी. याशिवाय, स्वच्छता, डासांचा प्रादुर्भाव कमी होणे याकडे बर द्यावे.”, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

- Advertisement -

हेही वाचा – कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; कोकण रेल्वे दोन तासांपासून विस्कळीत

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -