घरताज्या घडामोडीफडणवीसांवर गोवा निवडणुकीची जबाबदारी, पुन्हा एकदा गोव्यात सत्ता आणणार

फडणवीसांवर गोवा निवडणुकीची जबाबदारी, पुन्हा एकदा गोव्यात सत्ता आणणार

Subscribe

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने गोव्यात जे काम केले आहे, त्याच्या जोरावर आम्ही ही निवडणूक जिंकू.

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २०२२ मध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने फडणवीस यांना प्रभारी घोषित केले आहेत. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोवा विधानसभेची जबाबदारी सोपवली आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील वजनदार नेते मानले जातात आगामी निवडणुका लक्षात घेऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी फडणवीस यांना गोवा प्रभारी म्हणून नियुक्त केलं आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने गोव्यात जे काम केले आहे, त्याच्या जोरावर आम्ही ही निवडणूक जिंकू असा विश्वास व्यक्त करत देवेंद्र फडणीस यांनी प्रभारी केल्यामुळे नड्डांचे आभार मानले आहेत.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यात २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पाचही राज्यांच्या निवडणूक प्रभारींची घोषणा केली आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोवा राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फडणवीस हे भाजपचे गोवा विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहतील. तर फडणवीस यांच्यासोबत जी. किशन रेड्डी आणि दर्शना जर्दोश यांच्याकडे सह प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

- Advertisement -

फडणवीस यांची प्रतिक्रिया

गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्त केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गोवा विधानसभा निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी दिल्याबद्दल पक्षाचे अध्यक्ष नड्डा यांचे आभार मानतो. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही पुन्हा एकदा गोव्यात सत्ता स्थापन करु. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने गोव्यात जे काम केले आहे, त्याच्या जोरावर आम्ही ही निवडणूक जिंकू. आमचे लाडके पर्रिकर यावेळी नसतील, पण त्यांनी पक्षाला दाखवलेला मार्ग आणि दिशा कायम ठेवत आम्ही वाटचाल करु. महाराष्ट्र नेहमीच गोव्याच्या पाठीशी राहिला आहे. अमित शाह, नितीन गडकरी हे आमच्या पाठीशी आहेत. दोन केंद्रीय राज्यमंत्रीही आमच्यासोबत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही गोव्यात सत्ता मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


हेही वाचा :  राणे-ठाकरे येणार एकाच मंचावर; सिंधुदुर्गात ऑक्टोबरमध्ये रंगणार राजकीय दशावतार?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -