घरताज्या घडामोडीदाऊद कनेक्शन असणाऱ्या मंत्र्याला का वाचवलं जातंय?, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

दाऊद कनेक्शन असणाऱ्या मंत्र्याला का वाचवलं जातंय?, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

Subscribe

आम्ही जाब विचारला आहे परंतु सरकार पळ काढत आहेत. पण आमचा आग्रह आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये नवाब मलिकांचा राजीनामा झाला पाहिजे अशी भाजपची भूमिका असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी गदारोळ घातला होता. नवाब मलिकांचा राजीनामा का घेण्यात येत नाही? नवाब मलिकांना वाचवण्याचे काम कोण करतंय? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नवाब मलिकांचा राजीनामा घेतला नसल्याने महाविकास आघाडी सरकार दाऊद समर्थक असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. तसेच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात मंत्री जेलमध्ये असून राजीनामा घेण्यात आला नाही असे पहिल्यांदाच घडले असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नवाब मलिकांच्या राजीनाम्यावर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सभागृहात नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी फडणवीस यांनी केली होती. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात पहिल्यंदा एखादे मंत्री जेलमध्ये आहेत आणि त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. अशा प्रकारची भयानक परिस्थिती तयार झाली आहे. या मंत्र्यावर दाऊदशी व्यवहार केल्याचा आरोप आहे. रिमांडची ऑर्डर पाहिली तर कशाप्रकारे हा गुन्हा आहे त्याचा उल्लेख केला आहे. सरळ सरळ मुंबई बॉम्ब स्फोटाच्या आरोपींकडून जमीनीवर कब्जा मिळवून दिल्याबद्दल दाऊदची बहीण हसीना पारकरला ५५ लाख रुपये दिले. हे पैसे कुठे गेले यानंतर मुंबईत ३ बॉम्ब स्फोट करण्यात आले आहे. त्यामुळे हे पैसे मुंबई अस्थिर करण्यासाठी वापरण्यात आले आहेत. मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर मंत्र्याच्या पाठीशी सरकार उभे राहत असेल तर हे सरकार दाऊद समर्थक आहे असे आम्हाला म्हाणावे लागेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

कोणाच्या दबावाखाली मलिकांना वाचवलं जातंय?

नवाब मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे. संजय राठोड जेलमध्ये गेले नव्हते तरी नैतिकतेच्या आधारावर त्यांचा राजीनामा घेतला होता. परंतु नवाब मलिकांवर गंभीर आरोप असून ते जेलमध्ये गेले आहेत. तरी त्यांचा राजीनामा घेतला का जात नाही? नवाब मलिकांना वाचवण्याचे कारण काय? त्यांच्या मागे कोण आहेत? कोणाच्या दबावाखाली नवाब मलिकांना वाचवलं जात आहे? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. आम्ही जाब विचारला आहे परंतु सरकार पळ काढत आहेत. पण आमचा आग्रह आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये नवाब मलिकांचा राजीनामा झाला पाहिजे अशी भाजपची भूमिका असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

राज्यापालांच्या अभिभाषणावर फडणवीसांची प्रतिक्रिया

राज्यपाल सरकारच्या वतीन भाषण करायला आले होते. सदस्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या तुम्ही सरकारच्या वतीने भाषण करत आहेत. जर तेच सरकरा दाऊद समर्थक असेल तर हे अभिभाषण कशाला ऐकले पाहिजे यामुळे सदस्य नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करत होते आणि ही मागणी आम्ही लावून धरणार आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Maharashtra Assembly Budget Session 2022 : राज्यपालांच्या अभिभाषणावेळी जोरदार घोषणाबाजी, राज्यपालांनी अभिभाषण थांबवले

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -