घरताज्या घडामोडीमिशन सुरत-गुवाहाटी फत्ते करणाऱ्या रवींद्र चव्हाणांना फडणवीसांकडून बक्षीस

मिशन सुरत-गुवाहाटी फत्ते करणाऱ्या रवींद्र चव्हाणांना फडणवीसांकडून बक्षीस

Subscribe

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असून शिंदे गट आणि भाजप अशा एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. यावेळी भाजपकडून आमदार रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत होते. त्यानुसार चव्हाणांचा कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर काही आमदारांनी सुरत गाठले होते. त्यानंतर सुरतहून ते गुवाहाटीला पोहोचले होते. मात्र, ही गुप्त मोहिम फत्ते करण्यात आमदार रवींद्र चव्हाण यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिशन सुरत-गुवाहाटी फत्ते करणाऱ्या रवींद्र चव्हाणांना मोठं बक्षीस दिलं आहे.

ऑपरेशन लोटसची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र चव्हाण यांना दिली होती. चव्हाण हे त्यांच्या 200 कार्यकर्त्यांसह 4 दिवस सुरतमध्ये होते. विधान परिषदेच्या मतदानादिवशी चव्हाणांनी शिंदेंसोबत या सर्व आमदारांची सविस्तर बैठक घेतली होती. तसेच सुरतपर्यंत बसेस आणि खासगी वाहनांची व्यवस्था चव्हाण आणि शिंदेंच्या खास माणसांनी केली होती.

- Advertisement -

चव्हाण आणि शिंदे यांच्यात अनेक बैठकाही झाल्या होत्या. सुरतहून गुवाहाटीला जाण्याचा निर्णय चव्हाणांनीच सेना आमदारांना दिला होता. तसेच चव्हाणांनी प्रत्येक अपडेट ही देवेंद्र फडणवीसांना दिली होती. रवींद्र चव्हाण हे फडणवीसांचे अगदी निकटवर्तीय नेते समजले जातात. त्यामुळे ऑपरेशन लोटसला यश मिळाल्यानंतर फडणवीसांनी त्यांना मोठं बक्षीस दिलंय.

रवींद्र चव्हाणांचा राजकीय प्रवास काय?

- Advertisement -

आमदार रवींद्र चव्हाण यांचा जन्म तळ कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर गावात झाला. तर त्यांचे बालपण मुंबईत भांडुप परिसरात गेले. 2002 साली भारतीय जनता युवा मोर्चाचे कल्याण उपजिल्हाध्यक्ष पदावर त्यांची नेमणूक झाली. 2005 साली डोंबिवलीतील सावरकर रोड प्रभागातून कल्याण-डोंबिवली महापालिकेत प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले.

2019 साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोकण पट्ट्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवून सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. सध्या आमदार असताना त्यांची 2020 साली भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली.


हेही वाचा : होनी को अनहोनी कर दे..! सत्तारांना मंत्रिपद तर शिरसाट यांचा पत्ता कट, नक्की काय घडलं?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -