घरमहाराष्ट्रपुणेDhangekar On Fadnavis : आयेगा तो धंगेकरही; दिलं थेट फडणवीसांना आव्हान

Dhangekar On Fadnavis : आयेगा तो धंगेकरही; दिलं थेट फडणवीसांना आव्हान

Subscribe

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी तुम्ही इच्छुक आहात का? असे आमदार रवींद्र धंगेकरांना विचारले असता ते म्हणाले की, मी 30 वर्षापासून राजकरणात सक्रीय आहे. या कालावधीत कसबा विधानसभा मतदारसंघात विविध प्रभागातून नगरसेवक म्हणून पुणे महापालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्या प्रत्येक निवडणुकीत समाजातील सर्व घटकांनी संधी दिल्याने नगरसेवक म्हणून काम करता आले.

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत आहे तो पुणे आणि बारातमी लोकसभा मतदार संघ. कारण, पुणे लोकसभा मतदारसंघात सगळ्याच पक्षांनी दंड थोटपलेले असतानाच काँग्रेसही यामध्ये कुठे मागे नसल्याचे चित्र आहे. अशातच काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिले असून, ते जरी उभे राहिले तरी त्यांचा पराभव करणार असल्याचे ते म्हणाले. (Dhangekar On Fadnavis Ayega to Dhangekar too Gave a direct challenge to Fadnavis)

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी तुम्ही इच्छुक आहात का? असे आमदार रवींद्र धंगेकरांना विचारले असता ते म्हणाले की, मी 30 वर्षापासून राजकरणात सक्रीय आहे. या कालावधीत कसबा विधानसभा मतदारसंघात विविध प्रभागातून नगरसेवक म्हणून पुणे महापालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्या प्रत्येक निवडणुकीत समाजातील सर्व घटकांनी संधी दिल्याने नगरसेवक म्हणून काम करता आले. त्याच दरम्यान मागील वर्षी झालेली कसबा विधानसभा पोटनिवडणूक सर्व सामान्य नागरिकांनी हातामध्ये घेतल्याने मी आमदार झालो आहे असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

संधी मिळाली तर निवडणूक लढेन

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी अनेकजण इच्छुक असून, यामध्येच आता आमदार रवींद्र धंगेकरांच्या नावाची चर्चा होत आहे. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, लोकसभा निवडणुक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आणि पुन्हा एकदा माझ्या नावाची या निवडणुकीसाठी चर्चा सुरू झाली आहे. जर मला काँग्रेस पक्षाने निवडणूक लढविण्याची संधी दिली तर मी नक्कीच लढेल आणि जिंकेलसुद्धा असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : Pankaja Munde: ‘मला पद मिळालं तर देशात अव्वल…’; पंकजा मुंडेंनी पुन्हा केली खंत व्यक्त

- Advertisement -

फडणवीसांचाही पराभव करेल

पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा आहे. याबाबत बोलताना आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, या सर्व चर्चेवर एकच सांगू इच्छितो, आजवर पुणेकर नागरिक माझ्या पाठीशी राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीत देखील माझ्या पाठीशी राहतील. त्यामुळे पुण्यातून देवेंद्र फडणवीस यांनी लढवावी किंवा त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी ही निवडणूक लढवावी, ही निवडणूक मीच जिंकणार अशी भूमिका मांडत भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आमदार रवींद्र धंगेकरांनी आव्हान दिलं.

हेही वाचा : Zeeshan Siddique : काँग्रेसने पदावरून हकालपट्टी केल्याने झिशान सिद्दीकी संतापले

पुण्यातून या नावांची चर्चा

आगामी लोकसभा निवडणूक काहीच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपकडून जगदीश मुळीक, मुरलीधर मोहोळ, सुनील देवधर, तर काँग्रेसकडून अरविंद शिंदे, मोहन जोशी, रवींद्र धंगेकर, मनसेकडून वसंत मोरे, साईनाथ बाबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दीपक मानकर यांच्या नावाची चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -