घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रडाएटीशयन ते फॅशन व इंटेरिअर डिझायनर; मुलींना करिअरच्या असंख्य संधी

डाएटीशयन ते फॅशन व इंटेरिअर डिझायनर; मुलींना करिअरच्या असंख्य संधी

Subscribe

नाशिक : व्यवसायाभिमुख, स्पर्धा परीक्षा यादृष्टीने महाविद्यालयात विद्याशाखांचे विविध पर्याय आहेत. कौशल्याधारित अभ्यासक्रमांमुळे यंदा मुलींचा कल अधिक आहे. मुलींमधील उपजत कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठीच काही अभ्यासक्रम डिझाईन केलेले आहेत. याला महाविद्यालयांतर्गत आयोजित उपक्रमांची जोड लाभते. याचा परिपाक म्हणजे अनेक रुग्णालयांमध्ये आमच्या महाविद्यालयातून बाहेर पडलेल्या विद्यार्थिनी आहारतज्ज्ञ अर्थात डाएटिशिएन म्हणून कार्यरत आहेत. अनेकांचे स्वतःचे बुटिक आहे. स्वयंरोजगार असो किंवा भविष्यातील सरकारी क्षेत्रातील संधी, हे लक्षात घेऊन मुलींनी शाखा निवडाव्यात, असे मत एसएमआरके, बीके, एके महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे यांनी माय महानगरशी बोलताना व्यक्त केले.

  • अन्य महाविद्यालयांच्या तुलनेत तुमच्या महाविद्यालयाचे वेगळेपण काय सांगाल?
    : एसएनडीटी विद्यापीठाशी संलग्न असलेले एसएमआरके, बीके, एके हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव महिला महाविद्यालय आहे. त्यामुळे साहजिकच अभ्यासक्रमांची रचनादेखील अधिक प्रगत करण्यात आली आहे. कनिष्ठ महाविद्यालयात सायन्स, होम सायन्स, आर्ट्स, कॉमर्स तर, वरिष्ठ महाविद्यालयात बीए, बी. कॉम., बॅचलर इन होम सायन्स, बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडिज्, सर्टिफिकेट व डिप्लोमा कोर्सेसमध्ये फॅशन अँड इंटेरिअर डेकोरेशन, कम्प्युटर अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी हे पर्यायदेखील आमच्याकडे उपलब्ध आहेत. ट्रॅव्हल अँड टुरिझम, फूड टेक्नोलॉजी हे व्होकेशनल अभ्यासक्रमदेखील आमच्याकडे आहेत. असे एकूण ३३ पर्याय आम्ही उपलब्ध करुन दिलेले आहेत. विशेष म्हणजे यात मराठी आणि इंग्रजी भाषेचा पर्यायदेखील आहे.
  • कोर्सेससाठी किती जागा आहेत?
    : ज्युनिअर व सिनीअरच्या आठही अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी १२० जागा आहेत. तर, बीएमएससाठी ६०, एम.ए., एम.कॉमसाठी प्रत्येकी ३० जागा आहेत.
  • अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करिअरच्या दृष्टीने काय संधी असतात?
    : इतर महाविद्यालयांमधून बाहेर पडल्यानंतर जसे पर्याय असतात, तसेच या महाविद्यालयालाही लागू आहेत. मुली स्पर्धा परीक्षा, बँकांच्या वेगवेगळ्या परीक्षा देऊ शकतात. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी स्वतःचा उद्योग सुरू करू शकतात.
  • महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी इतर काही उपक्रम असतात का?
    : स्पर्धा परीक्षांची आवड असलेल्या विद्यार्थिनींसाठी महाविद्यालयात सावित्री कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन सेल नावाने स्पर्धा परीक्षांचे सेंटर आहे. नृत्य, लिखाण, वक्तृत्व अशी आवड असलेल्या विद्यार्थिनींसाठी अंतर्गत मॅगजिन, उपक्रम, स्नेहसंमेलन, समाजोपयोगी कार्यक्रमदेखील राबविले जातात.
  • मुलींचा सर्वाधिक कल कोणत्या अभ्यासक्रमाला आहे?
    : दरवर्षी कॉमर्स आणि मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांकडे मुलींचा अधिक कल असतो.
  • महाविद्यालयाची वैशिष्ठ्ये सांगायची तर काय सांगाल?
    : हे उत्तर महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय आहे, जे एसएनडीटी विद्यापीठाशी संलग्न आहे. महिला सबलीकरण व सक्षमीकरण हे एकमेव ध्येय समोर ठेवून आमची वाटचाल सुरू आहे. याशिवाय उद्योजकतेला वाव देण्यासाटी आंत्रप्रिन्युअरशिप सेल सुरू आहे. प्रत्येक शाखेचे असोसिएशन आहे. यात मुली आपले गुण सादर करतात. यातूनच व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत मिळते. प्राध्यापिकांसाठी इम्प्रेशन तर, मुलींसाठी शतरुपा हे मासिक आहे. मिस एसएमआरके ही स्पर्धा तर प्रसिद्ध आहे. माजी विद्यार्थिनी आजी विद्यार्थिनींसाठी गरबा आयोजित करतात. याशिवाय, प्रत्येक शाखेसाठी चर्चासत्र, कार्यशाळा, परिसंवाद आयोजित केले जातात. दरवर्षी असे ९०हून अधिक उपक्रम, कार्यक्रम होतात. आयएसओ ९००१-२०१५ मानांकनही महाविद्यालयाला मिळालेले आहे. लायब्ररीचे ९५ टक्के ऑटोमेशन झालेले आहे. औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांत जाऊन तेथील कर्मचारी वर्गासाठी पूरक व पोषक आहार काय असू शकतो, यासाठी मेन्यू ठरवून देण्याचे कामही आमच्या विद्यार्थिनी करतात. राष्ट्रपुरुषांच्या जयंतीच्या दिवशी आदिवासी पाड्यांवरील शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, आर्थिक मदत केली जाते.
  • आर्थिक दुर्बल विद्यार्थिनींसाठी काही विशेष योजना आहे का?
    : आई धुणीभांडी, वडील मजुरी करतात अशाही मुली येतात. त्यांच्यासाठी वेल्फेअर फंड ठेवलेला आहे. त्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत दिली जाते. टप्प्याटप्याने शुल्क भरण्याची सुविधा आहे. दरवर्षी कनिष्ठ महाविद्यालयातील १० विद्यार्थिनींना दत्तक घेतले जाते. त्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च महाविद्यालयाकडून केला जातो.
  • नवीन शैक्षणिक धोरणामुळे तुमच्या अभ्यासक्रमात काय बदल होणार आणि त्यादृष्टीने काय तयारी केलीय?
    : नवीन शैक्षणिक धोरणामुळे सर्वच ठिकाणचा अभ्यासक्रम बदलणार आहे. हा अभ्यासक्रम चार वर्षांचा असेल. त्यात चॉईस बेस क्रेडिट सिस्टम असेल. त्यादृष्टीने आमचा सिलॅबस तयार झालाय.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -