घरमहाराष्ट्रडोस घेऊनही डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग

डोस घेऊनही डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग

Subscribe

कोविड लसीच्या विश्वासार्हतेचा प्रश्न गंभीर

राज्यात पुन्हा वाढत असलेल्या कोरोनाच्या संकटात नव्या समस्येने जोर धरला आहे. कोरोना होऊ नये, म्हणून अनेकजण लस टोचून घेण्यासाठी धावपळ करत असताना कोरोनाचे डोस घेतलेल्या अनेकांना या संसर्गाने पुन्हा गाठल्याचे उघड झाले आहे. कोरोना लसीचा परिणाम या संसर्गावर होत नसल्याची बाब या निमित्त उघड झाली असून, लसीची विश्वासार्हता संशयात सापडली आहे.

गेल्या मार्च महिन्यापासून जगभर फैलावलेल्या कोरेाना संसर्गाने सुमारे ५५ लाख लोकांचा जीव घेतला आहे. भारतात या संसर्गाने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दीड लाखांवर जाऊन पोहोचली आहे. महाराष्ट्रातील कोरोनातील मृतांचा आकडा ५१ हजार ६३१ इतका झाला आहे. या संकटातून बचाव करण्यासाठी जगभरातील औषध कंपन्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन कोरोना लसीचे उत्पादन घेतले आहे. भारत बायोटेकनेही यात आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रातही लसीचे उत्पादन घेत पुण्यातील सोली पुनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटने आघाडी घेतली होती. पहिल्या टप्प्यात सिरमने दहा कोटी डोस निर्माण केले. या लसीचे वाटप कोरोना काळात प्रत्यक्ष कृतीत असलेले डॉक्टर, परिचारक, परिचारिका, सुरक्षा रक्षक, पोलीस कर्मचार्‍यांना देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.

- Advertisement -

ठरल्याप्रमाणे कोविड योध्दा ठरलेल्या व्यक्तींना कोरोनाचे डोस देण्यात आले. पण त्याचे अपेक्षित परिणाम दिसत नसल्याची बाब नव्याने फैलावणार्‍या कोरोना संसर्गाने उघड झाली आहे. ज्या डॉक्टरांना कोरोनाच्या लस टोचण्यात आल्या होत्या त्यापैकी अनेक डॉक्टरांना पुन्हा कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. यातील सात डॉक्टर महाराष्ट्रातील असून दोघे औरंगबाद विभागातील आहेत. पुण्याच्या ससून रुग्णालयातील ज्या परिचारिकेने कोरोनाची लस घेतली होती तिलाही पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. ससूनचे अधिष्ठाता मुरलीधरन तांबे यांनी परिचारिकेला लस टोचूनही कोरोना झाल्याचे मान्य केले. पण घाबरण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यालाही कोरोना झाल्याचे उघड झाले. फार्मासिस्ट असलेल्या या कर्मचार्‍याला कोरोनाची लस देण्यात आली होती. हरियाणाचे आरोग्य मंत्री अनील वीज यांनी १४ दिवसांपूर्वी कोरोनाची लस घेतली होती. मात्र तरीही त्यांना कोरोनाने गाठले. लस टोचूनही कोरोना होत असल्याचे प्रथमदर्शनी उघड झाल्याने या लसीच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

दोन डोस गरजेचे
पुन्हा कोरोना होऊ नये, यासाठी कोव्हॅक्सिन लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहेत. दोन्ही डोस घेतल्याच्या 14 दिवसांनंतर त्याच्या परिणामाचे मूल्यांकन केले जाऊ शकते, असे भारत बायोटेक कंपनीने म्हटले आहे. लसीचा दुसरा डोस घेतल्याच्या 14 दिवसांनंतर ती प्रभावी ठरेल, यानंतर शरीरात अ‍ॅण्टीबॉडीज तयार होत असल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -