घरमहाराष्ट्रनुसतं बोलत बसू नका, दाखवून द्या, महापौर पेडणेकरांचं साटमांना खुलं आव्हान

नुसतं बोलत बसू नका, दाखवून द्या, महापौर पेडणेकरांचं साटमांना खुलं आव्हान

Subscribe

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी पत्रकार परिषद घेतलीय, त्यावेळी त्या बोलत होत्या. भाजपच्या प्रत्येकानं एक अजेंडा घेतलेला आहे आणि तो विरोधाचा आहे. इक्बाल चहल आणि यशवंत जाधव हे स्थायी समिती अध्यक्ष आहेत. ते त्यांचं काम करतायत. जिथे तुम्हाला वाटतंय चुकीचं आहे, तर पुढे या, नुसतं बोलत बसू नका. हजारदा आपण सांगितलंय बोलत नका बसू. दाखवून द्या, नुसतं बोलण्यानं काही होत नाही.

मुंबईः इक्बालसिंग चहल महापालिका आयुक्त आणि यशवंत जाधव हे स्थायी समिती अध्यक्ष आहेत. ते त्यांचं काम करतायत. जिथे तुम्हाला वाटतंय चुकीचं आहे, तर पुढे या, नुसतं बोलत बसू नका, असं म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी भाजपचे आमदार अमित साटमांवर पलटवार केलाय. अमित साटम यांनी चहल, जाधव आणि वेलरसू यांच्या रुपात मुंबई महापालिकेत ‘वाझेगिरी’ सूर असल्याचं म्हटलं होतं. त्यालाच आता महापौर पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिलंय.

हजारदा आपण सांगितलंय बोलत नका बसू. दाखवून द्या, नुसतं बोलण्यानं काही होत नाही. इक्बाल चहल हे त्यांच्या हिट लिस्टवर का असतात. कारण आज त्या आयुक्तांनी कोविड 19 च्या काळात जे काही काम केले. नुसतं तेच काम नाही केलं. तर सगळ्या बाजूनं ते नीट काम करत आहेत, असं म्हणत महापौर पेडणेकरांनी विरोधकांना खडेबोल सुनावलेत.

- Advertisement -

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी पत्रकार परिषद घेतलीय, त्यावेळी त्या बोलत होत्या. भाजपच्या प्रत्येकानं एक अजेंडा घेतलेला आहे आणि तो विरोधाचा आहे. इक्बाल चहल आणि यशवंत जाधव हे स्थायी समिती अध्यक्ष आहेत. ते त्यांचं काम करतायत. जिथे तुम्हाला वाटतंय चुकीचं आहे, तर पुढे या, नुसतं बोलत बसू नका. हजारदा आपण सांगितलंय बोलत नका बसू. दाखवून द्या, नुसतं बोलण्यानं काही होत नाही. इक्बाल चहल हे त्यांच्या हिट लिस्टवर का असतात. कारण आज त्या आयुक्तांनी कोविड 19 च्या काळात जे काही काम केले, असंही महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्यात.

नुसतं तेच काम नाही केलं. तर सगळ्या बाजूनं ते नीट काम करत आहेत. नेमकी विरोधकांची हीच पोटदुखी आहे. विरोधकांना हे नकोय. जास्तीत जास्त काही नसताना एवढा ढोल वाजवतात. काही घडेल आणि आम्हाला मोठ्या पद्धतीनं ढोल वाजवायला मिळेल, असं ते बघतायत, हे त्यांचं फ्रस्टेशन आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं त्यात काही चूक नाही. कुठलाही प्रश्न कोणीही कधीही कसाही विचारू शकतो. आमचं कुठलंही काम कौतुक व्हावं म्हणून केलं नाही, असंही महापौर किशोरी पेडणेकरांनी अधोरेखित केलंय.

- Advertisement -

गेल्या 25 वर्षांतील 20 वर्ष बरोबर होते हे तरी कबूल करतील ना, मग 25 वर्षांत तुमच्या बुद्धीला गंज चढला होता काय?, आता तो गंज उतरलाय आणि आता तो कळतोय. किती लोकांना गंडवायला जाल. गेल्या 25 वर्षांत सगळी पदं भोगलात. सगळ्या कमिटींवर अध्यक्ष राहिलात. जे मिळवायचं ते मिळवलात. तरीही वर तोंड करून गेल्या 25 वर्षांचं सांगतायत. म्हणून मुख्यमंत्री म्हणाले, प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही. गेल्या 25 वर्ष मांडीला मांडी लावून नव्हे, तर मांडीवरच बसला होता. 20 वर्षांचा पहिला तुम्ही हिशेब द्या. आमच्याबरोबर होता तो दाखवा मग मागचा देतो, असंही महापौर किशोरी पेडणेकर भाजपला उद्देशून म्हणाल्यात.

महापालिकेच्या प्रत्येक खात्यामध्ये सचिन वाझे

गेल्या 25 वर्षामध्ये स्थायी समिती वसुली समिती झालीये. परंतु 2015 मध्ये 6000 रुपयांना महापालिका टॅब विकत घ्यायची. त्याच टॅबची किंमत आता 20000 रुपये झाली असून, अशा पद्धतीचं टेंडर काढण्यात आलं. मिठी नदीचं सुद्धा 2 हजार कोटींचं पॅकेज आहे. त्याच्यामध्ये मिशीगन इंजिनीअर्स आणि म्हाळसा या दोन कंपन्यांना हे टेंडर मिळणार असल्याचं आज जाहीर करतो. महापालिकेच्या प्रत्येक खात्यामध्ये सचिन वाझे बसलेला आहे. पालिकेत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, आयुक्त इक्बालसिह चहल,वेलरसु यांच्या रुपात ‘वाझेगिरी सूर असून त्याचा नेमका ‘हँडलर’ कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे तसेच भ्रष्टाचार करायला अक्कल लागत नाही, अशी बोचरी टीका आमदार साटम यांनी केली.


हेही वाचा : मुंबई पालिकेत जाधव, चहल, वेलरसू त्रिमूर्तीच्या रूपात वाझे बसलाय, भाजप आमदार साटमांचा हल्लाबोल

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -