घरमहाराष्ट्रबाबासाहेब आंबेडकरांचे नातजावई आनंद तेलतुंबडेंना अखेर अटक!

बाबासाहेब आंबेडकरांचे नातजावई आनंद तेलतुंबडेंना अखेर अटक!

Subscribe

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयतींच्या दिवशीच त्यांचे नातजावई असलेले डॉ. आनंद तेलतुंबडे यांना अटक करण्यात आली आहे. कोरेगाव-भिमा हिंसाचार प्रकरणी आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा या दोघांवर देखील आरोप ठेवण्यात आला आहेत. या प्रकरणी या दोघांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयासमोर या प्रकरणाची सध्या सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात अटक होऊ नये, यासाठी या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील सादर केली होती. मात्र, मागच्याच आठवड्यात न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर आठवड्याभराच्या आत त्यांना एनआयए न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. आज १४ एप्रिल रोजी ही मुदत संपत असल्यामुळे हे दोघेही एनआयएच्या विशेष न्यायलयासमोर हजर झाले.

डॉ. आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा या दोघांवर कोरेगाव-भिमा हिंसाचार प्रकरणी आरोप ठेवण्यात आले आहेत. याप्रकरणी हे दोघेही हजर होताच न्यायालयाने त्यांची रवानगी एनआयएच्या कोठडीत केली. तेलतुंबडे आणि नवलखा यांनी समर्पण केलं तेव्हा त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर हे देखील हजर होते.

- Advertisement -

१ जानेवारी २०१८ रोजी पुण्याजवळच्या कोरेगाव-भिमा येथे उसळलेल्या दंगलीमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. तसेच, वित्तहानी देखील झाली होती. त्यानंतर देखील त्याचे राज्यभर पडसाद उमटले होते. या प्रकरणात ही सुनावणी सध्या एनआयएच्या विशेष न्यायालयासमोर सुरू आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचे नात जावई आणि प्रख्यात विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांना NIA ने ताब्यात घेणं यासारखी वेदनादायक दुसरी गोष्ट नाही. लॉकडाऊनच्या काळात लोकशाही हक्कांची होणारी पायमल्ली पाहण्यापलीकडे काही करता येत नाही, याचं दुःख आहे. या कुटुंबाशी असलेल्या वैचारिक नात्यातून आज त्यांच्यासोबत राहता आलं इतकंच.

आमदार कपिल पाटील, अध्यक्ष, लोक भारती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -