घरमहाराष्ट्रराखीव मतदारसंघ बदलले नसल्यामुळे नवे नेतृत्व उभे राहिले नाही

राखीव मतदारसंघ बदलले नसल्यामुळे नवे नेतृत्व उभे राहिले नाही

Subscribe

काँग्रेस-राष्ट्रवादीने मागच्या वीस वर्षात स्वतःच्या फायद्यासाठी राखीव मतदारसंघाचे रोटेशन बदलले नाही. ते बदलावे अशी मागणी आता इंडिया अगेन्स्ट करप्शन या संघटनेकडून होत आहे.

राज्यात आगामी २०१९ ला होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणूका रोटेशन पद्धतीने व्हाव्यात. राज्यात जे राखीव मतदार संघ आहेत, त्यांचे रोटेशन २० वर्षांनी बदलण्याची प्रथा बेकायदेशीरपणे काँग्रेस -राष्ट्रवादीने चालवली. त्यामुळे सर्वसामान्य नेतृत्व उभे राहिले नाही, असा आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी साताऱ्यातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केला. राज्यातील आगामी २०१९ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुका रोटेशन पद्धतीने राखीव करण्यात याव्यात. बारामती लोकसभा मतदार संघ अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी राखीव करावा. तर सातारा-जावळी, कराड उत्तर, कराड दक्षिण आणि फलटण येथील विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) साठी राखीव करावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असून आयोगाने मान्य न केल्यास उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी साताऱ्यातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

कायद्याचा आधार घेत आता नव्याने एससी आणि एसटीसाठी मतदार संघ राखीव करण्यात यावेत. राज्यातील लोकसभेसाठी ४८ जागापैकी पाच जागा एससी आणि चार जागा एसटी साठी आरक्षित असतील तर विधानसभा २८८ जागापैकी एससी साठी २९ तर एसटी.साठी २५ जागा आरक्षित असतील, असे परीसीमन अधिनियमामध्ये म्हटले आहे. त्यामुळे इंडिया अगेन्स्ट करप्शनच्यावतीने कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करताना आगामी निवडणूका राखीव असणार्‍या मतदारसंघात रोटेशन पद्धतीने करण्यात याव्यात, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

निवडणूक आयोगाने मागणीची दखल वेळेत न घेतल्यास उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा ही पाटील यांनी दिला आहे. तर काही मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने राजकीय खेळ्या केल्या आहेत, त्या भाजप-शिवसेनेला माहीत नाहीत. त्यांच्या या खेळ्या लवकरच उघड करणार असून बहुजनांच्या न्याय हक्कासाठी जेजुरी येथे बहुजन दसरा मेळाव्याचे आयोजन २५ ऑक्टोबर रोजी केले असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -