घरमहाराष्ट्रमहडमध्ये डम्पिंग ग्राऊंड

महडमध्ये डम्पिंग ग्राऊंड

Subscribe

स्थानिकांसह भाविकांना त्रास

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या तालुक्यातील महड गावाच्या हद्दीत उघड्यावर टाकण्यात येणार्‍या कचर्‍याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने नागरिक व त्या ठिकाणी येणार्‍या भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.खालापूर नगरपंचायत हद्दीतील खालापूर शहर, वनवे निंबोंडे, महड, तसेच या हद्दीतील हॉटेलमधून जमा होणारा ओला व सुका कचरा महड येथील मोकळ्या जागेत टाकला जातो. गावात प्रवेश करताना काही अंतरावर कचरा टाकला जात आहे. ओला व सुका असे कचर्‍याचे वर्गीकरण न करता कचरा एकाच ठिकाणी जमा करून पेटवला जातो. कचरा जाळल्याने मोठ्या प्रमाणात हवेत राख व धूर पसरत आहे. तसेच कचरा संपूर्णपणे जळत नसल्याने शिल्लक कचर्‍याचे ढिग जमा होऊ लागले आहेत.

मोकाट कुत्री, जनावरे कचरा डम्पिंग ग्राऊंडवर येत असून परिसरात कचरा पसरला जातो. कचर्‍याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लागावी यासाठी तीन वर्षांपूर्वी ओला व सुका कचरा अशी शेड या ठिकाणी बांधण्यात आली होती. परंतु आता एक शेड जमिनदोस्त झाली असून, दुसर्‍या शेडचे गंजलेले लोखंडी पाईप शिल्लक आहेत. स्वच्छ अभियान अंतर्गत सर्वत्र सफाई मोहीम असताना अष्टविनायकापैकी एक असलेल्या बाप्पाच्या गावात भविष्यात डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न जटिल होणार आहे. गावाचे पावित्र्य जपण्यासाठी योग्य उपाययोजना होणे आवश्यक आहे. या संदर्भात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे सुट्टीवर असल्याने महड डम्पिंग ग्राऊंडबाबत त्यांची प्रतिक्रिया समजली नाही.

- Advertisement -

महड हद्दीत कचरा टाकू नये यासाठी नगरपंचायतीला पत्र दिले होते. कचर्‍यावर कोणतीच प्रक्रिया होत नसल्याने दुर्गंधी आणि धुरामुळे वातावरण प्रदूषित होत आहे. काही अंतरावर शाळादेखील आहेत. नगरपंचायतीने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. -मंदार जोशी, महड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -