घरताज्या घडामोडीED : नवाब मलिकांनंतर सेनेचा कोणता बडा नेता ED च्या रडारवर ?...

ED : नवाब मलिकांनंतर सेनेचा कोणता बडा नेता ED च्या रडारवर ? कोणत्या नेत्याची चौकशी होणार?

Subscribe

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन मंत्र्यांना अंमलबजावणी संचलनालयाने कारवाईने केल्याने मोठा फटका बसला. त्यापैकी एका मंत्र्याला सध्या न्यायालयीन कोठडीत मुक्काम आहे. तर दुसऱ्या मंत्र्याचे मंत्रीपद जाण्याच्या मार्गावर आहे. ईडीच्या रडारवर आता शिवसेनेचा कोणता बडा नेता रडारवर आहे ? अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये सेनेच्या कोणत्या नेत्यांची चौकशी होणार याबाबत तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.

अनिल परबांना कोणते प्रकरण भोवणार ?

भ्रष्टाचाराच्या ज्या प्रकरणात अनिल देशमुख यांना मंत्रीपद गमवावे लागले, त्याच बदल्यांच्या प्रकरणात परिवहन मंत्री अनिल परब यांचेही कनेक्शन असल्याने अनिल परब हे इडीच्या रडारवर आहेत. अनिल परब यांच्या नावाचा उल्लेख निलंबित पोलीस उपनिरीक्षक सचिन वाझेने चौकशी दरम्यान घेतले होते. महापालिकेतील कंत्राटदारांकडून खंडणी गोळा करण्याच्या सूचना अनिल परब यांनी दिल्याचा आरोप वाझेने केला होता. या प्रकरणात पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचा संशय ईडीला आहे. त्यामुळेच ईडीने या प्रकरणात अनिल देशमुख यांना दोनवेळा समन्स बजावला होता. दुसऱ्यांदा समन्स मिळाल्यानंतर अनिल परब यांनी ईडीच्या चौकशीला हजेरी लावली होती. अनिल देशमुख यांची तब्बल ८ तास चौकशी चालली होती. या चौकशीनंतर ईडीला पूर्ण उत्तरे दिली असून मी पुन्हा सहकार्य करण्यासाठी तयार असल्याची प्रतिक्रिया अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुलींची शपथ घेऊन अनिल परब यांनी कोणतेही चुकीचे काम केले नसल्याची प्रतिक्रिया या चौकशी भेटीनंतर दिली होती.

- Advertisement -

त्यामुळे महापालिकेतील खंडणी गोळा करण्याच्या प्रकरणात अनिल परब यांच्यावर ईडीकडून कारवाईची शक्यता बोलली जात आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीही नवाब मलिकांनंतर आता अनिल परब यांच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याचे संकेत दिले होते. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने कितीही दादागिरी केली तरीही, आम्ही घोटाळेबाजांना सोडणार नाही. महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करणार अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली होती.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -