नागपुरात ‘या’ ठिकाणी ED चे छापे, कोणत्या प्रकरणात कारवाई? जाणून घ्या

महाराष्ट्रात ईडी पुन्हा सक्रीय झाले असून नागपुरात छापेमारी केलीय.

ED-Raid-Nagpur
महाराष्ट्रात ईडी पुन्हा सक्रीय झाले असून नागपुरात छापेमारी केलीय.

महाराष्ट्रात ईडी पुन्हा सक्रीय झाले असून नागपुरात छापेमारी केलीय. नागपुरमधील एक सुप्रसिद्ध कंपनीच्या मालकाच्या घरी ही छापेमारी करण्यात आलीय. सकाळच्या सुमारास ईडीने ही छापेमारी केली.

आर संदेश ग्रुपचे मालक रामदेव उर्फ रम्मु अग्रवाल यांचे घर आणि कार्यालयात ईडीचे पथक धडकले. या पथकाने रम्मू अग्रवाल यांच्यासह आणखी काही व्यावसायिकांवर ईडीची कारवाई सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. नागपूरच्या कॅनल रोडवरील गौरी हाइट्स, रामदास पेठ परिसरातील रम्मू अग्रवाल यांच्या कार्यालयात कारवाई सुरू आहे. आर संदेश ग्रुपचे बांधकाम आणि औषध यासह अनेक व्यवसाय आहेत.

आर संदेश ग्रुपच्या जमिन खरेदी प्रकरणी हे छापे असल्याची माहिती समोर येत आहे. नागपुरात अनेक मोक्याच्या ठिकाणी आर संदेश ग्रुपने जमिनी खरेदी केल्या आहेत. यामुळे चौकशीसाठी ईडीचे पथक शुक्रवारी पहाटेच पोहचले. ईडीचे अधिकाऱ्यांनी अद्याप याबद्दल माहिती दिलेली नाहीये.