घरताज्या घडामोडीSC च्या दणक्यानंतर अनिल देशमुखांना पुन्हा ED चा समन्स

SC च्या दणक्यानंतर अनिल देशमुखांना पुन्हा ED चा समन्स

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका फेटाळली असतानाच आता अंमलबजावणी संचालनालया(ED) ने अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ह्षिकेश देशमुख यांना मनी लॉंडरिंग प्रकरणात पुन्हा समन्स बजावले आहे. या नव्याने बजावलेल्या समन्सनुसार त्यांना येत्या सोमवारी ईडीच्या चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे. याआधीच अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणाशी संबंधित असलेल्या अशा मुंबई, पुणे आणि नगरमध्ये १२ ठिकाणी ईडीने धाडी टाकल्या आहेत. आज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात अनिल देशमुख यांच्या याचिकेवर कोणताही दिलासा दिला नाही. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणीत आणखी भर पडली आहे. आजच्या निकालानंतर लगेचच ईडीमार्फत अनिल देशमुख यांना समन्स बजावण्यात आला. आतापर्यंत अनिल देशमुख यांनी ईडीने पाठवलेल्या तिन्ही समन्सला उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयातील याचिकेची ढाल वापरली होती. पण आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता अनिल देशमुखांसमोरील अडचणी आणखी वाढणार आहेत.

- Advertisement -

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर ईडी एक्शनमध्ये आली होती. या संपुर्ण प्रकरणात आतापर्यंत ईडीने तीनवेळा अनिल देशमुख यांना समन्स पाठवला होता. पण या संपुर्ण प्रकरणात अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचा आधार घेत आतापर्यंत बचावात्मक पवित्रा घेतला होता. आतापर्यंत अनिल देशमुख यांनी फक्त वकिलामार्फतच चौकशीसाठी प्रतिसाद दिला आहे. या चौकशीच्या निमित्ताने आवश्यक कागदपत्रे अनिल देशमुख यांनी सादर केली आहेत. पण ईडीने मात्र अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा समन्स बजावत येत्या सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना चौकशीला हजर राहण्याशिवाय आता कोणताच पर्याय नाही हे आता स्पष्ट झाले आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -