घरताज्या घडामोडीपोटनिवडणूक : सर्वाधिक 77 टक्के तेलंगणातील मुनूगोडेत, तर अंधेरी पूर्वमध्ये केवळ 31...

पोटनिवडणूक : सर्वाधिक 77 टक्के तेलंगणातील मुनूगोडेत, तर अंधेरी पूर्वमध्ये केवळ 31 टक्केच मतदान

Subscribe

देशभरातील सहा राज्यातील 7 विधानसभा मतदारसंघात गुरूवारी मतदान झाले. सहा राज्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी गुरूवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान पार पडले. या राज्यांपैकी सर्वाधिक मतदान तेलंगणामधील मुनूगोडे या मतदारसंघात झाले आहे.

देशभरातील सहा राज्यातील 7 विधानसभा मतदारसंघात गुरूवारी मतदान झाले. सहा राज्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी गुरूवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान पार पडले. या राज्यांपैकी सर्वाधिक मतदान तेलंगणामधील मुनूगोडे या मतदारसंघात झाले आहे. याठिकाणी सर्वाधिक म्हणजे 77.55 टक्के मतदान झाले आहे. तसेच, सर्वाधिक कमी मतदान महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व मतदार संघात झाले आहे. याठिकाणी सर्वाधिक कमी म्हणजे 31.74 टक्केच मतदान झाल्याची माहिती मिळते. या 6 जागांवर झालेल्या या निवडणुकांचे निकाल 6 नोव्हेंबर रोजी लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील गोळा गोकर्णनाथ येथे 55.68 टक्के मतदान झाले. हरियाणातील आदमपूर येथे 75.25 टक्के मतदान झाले. बिहारमधील मोकाममध्ये 53.45 आणि गोपाळगंजमध्ये 51.48 टक्के मतदान झाले. महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व येथे 31.74 टक्के मतदान झाले. तसेच, तेलंगाणातील मुनुगोडे येथे 77.55 आणि ओदिशातील धामनगर या ठिकाणी 66.63 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळते.

- Advertisement -

महत्त्वाची निवडणूक

  • 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी या निवडणुका देशभरातील प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. गुरूवारी झालेले सर्व सात ठिकाणचे मतदान शांततेत पार पडले.
  • सुभाष सिंह बिहारच्या गोपाळगंज मतदारसंघातून आमदार होते. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली. बिहारमध्ये नितिश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारसाठी गोपाळगंजची निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.
  • मुंबईतील अंधेरी पूर्वच्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच, ठाकरे गटासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.
  • उत्तर प्रदेशातील गोळा गोकर्णनाथ विधानसभा मतदारसंघ भाजपचे आमदार अरविंद गिरी यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली.
  • कुलदीप बिश्नोई यांनी हरियाणाच्या आदमपूर मतदारसंघातून राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेस सोडून ते भाजपमध्ये गेले, त्यानंतर ही जागा रिक्त झाली.
  • आरजेडीचे अनंत सिंह हे बिहारमधील मोकामा मतदारसंघातून आमदार होते, पण AK-47 बाळगल्याच्या आरोपावरून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक झाली.
  • महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश लटके आमदार होते. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे येथे पोटनिवडणूक झाली.

हेही वाचा – विकासाला गती देण्यासाठी किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -