घरठाणेरस्त्याचा मोबदला न मिळाल्याने कल्याणमधील गौरीपाड्यातील शेतकरी आक्रमक

रस्त्याचा मोबदला न मिळाल्याने कल्याणमधील गौरीपाड्यातील शेतकरी आक्रमक

Subscribe

कल्याण : रस्त्याचा मोबदला न मिळाल्याने कल्याणमधील गौरीपाड्यातील शेतकरी आक्रमक झाले असून जोपर्यत मोबदला मिळत नाही तोपर्यत येथे असलेल्या सोसायटीकडे जाणारा कच्चा रस्ता रोखण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. यानंतर याठिकाणी केडीएमसी प्रशासनाने मध्यस्थी करत हा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला असता केडीएमसी अधिकारी, पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना आज घडली आहे. यावेळी संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांनी हातात दांडके घेऊन स्थानिक शेतकरी व विधवा महिलांना शिवीगाळ करून धमकावले असल्याचा आरोप या शेतकर्यांनी केला असून याबाबत त्यांनी निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे ब प्रभाग अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील वुदांवन सोसयटीकडे जाणाऱ्या डीपी रस्ताचा टीडीआर अथवा मोबदला शेतकरी कुटुंबियांना मिळला नसल्याने या रस्त्याबाबत हरकत असल्याने हा रस्ता न्यायप्रविष्ट असताना सोसायटीच्या मागील बाजूने पर्यायी रस्तासाठी जागा शेतकऱ्यांनी उपलब्ध करून दिली आहे. असे असतांना पालिकेचे ‘ब’ प्रभागक्षेत्र अधिकारी दबंगगिरी करीत पोलीस फाटा घेऊन आले असता बाचाबाचीचा प्रसंग निर्माण झाला. राजेश सावंत यांनी हातात दांडके घेऊन विधवा महिला व शेतकऱ्यांना शिवीगाळ व धमकावण्याचा प्रयत्न केलाचा आरोप संत्पत शेतकऱ्यांनी आयुक्त यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केला असून निवेदनद्वारे “ब” प्रभागक्षेत्र आधिकारी यांच्या वर कारवाईची मागणी शुक्रवारी केली आहे. पालिकेकडून शेतकऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी द्वारकानाथ म्हात्रे यांनी केला आहे.

- Advertisement -

“ब” प्रभागक्षेत्र आधिकारी राजेश सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सोसायटीकडे जाणारा रस्ता खोदला असून तो पूर्ववत होण्याबाबत सोसायटी रहिवाशांची मागणी होती. आयुक्त यांच्या आदेशानुसार शुक्रवारी पोलीस बंदोबस्त घेऊन गेलो असता शेतकऱ्यांना समजवून सांगण्याचा प्रयत्न केला की, टी डी आर् अथवा मोबदला मिळणेबाबत प्रशासन मदत करील, रस्ता सुरु व्हावा. असे सांगितले पण उपस्थित शेतकरी ऐकण्यास तयार नसल्याने आम्ही परत आलो. महिलांना, विधवांना शिवगाळ केल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. उलट १०० ते १५० लोकांनी आपल्याला घेरावा घातला असल्याचे सावंत यांनी सांगितले.

“नगररचनाकार दिक्षा सावंत यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिल्या नंतर त्यांनी याप्रकरणी शेतकऱ्यांना टीडीआर देण्याबाबत आग्रही असून संदर्भीत रस्ता डीपी रस्ता असल्याचे सांगितले. तर नगररचनाकार यांना निवेदन देण्या प्रसंगी उपस्थित असलेले मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी शेतकऱ्यांना टीडीआर अथवा मोबदला देणे अत्यंत गरजेचे असून विकासकाच्या दृष्टीकोनातून शेतकरी हा घटक महत्वाचा असून त्यांना जमिनीचा मोबदला मिळला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -