घरठाणेमहाराष्ट्रात सीमा प्रश्न सुरु आहे तो सुटाला पाहिजे-केंद्रीय मंत्री रामदास आठवले

महाराष्ट्रात सीमा प्रश्न सुरु आहे तो सुटाला पाहिजे-केंद्रीय मंत्री रामदास आठवले

Subscribe

राज्यपालांबाबत राष्ट्रपतीनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा

कल्याण : छत्रपती शिवाजी महाराज कालच्या, आजच्या व उद्याच्या पिढीचे आदर्श आहेत. त्यांच्या नावाने समाजकारण, राजकारण करणारे सर्व पक्ष आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आपली भूमिका मांडणारे अनेक पक्ष आहेत. त्यामुळे महापुरुषांबद्दल अशा प्रकारची भूमिका योग्य नाही. त्यांच्याबद्दल अशा पद्धतीचे वक्तव्य कोणी करू नये. म्हणूनच राज्यपालांच्या विरोधात असंतोष असून राज्यपालाबाबत जो काही निर्णय घ्यायचा तो अधिकार राष्ट्रपतींचा आहे, त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.

रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन चे राज्यस्तरीय अधिवेशन कल्याण मधील आचार्य अत्रे नाट्यगृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते. यावेळी संजय थोरात भगवान पवार दादासाहेब शिंदे गौतम रातांबे व अन्य रिपब्लिकन नेते व फेडरेशनचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथील एका कार्यक्रमात वक्तव्य केले. याबाबत आठवले यांना विचारले असता सरकार वर अवलंबून न राहता स्वताच्या बळावर शाळा चालवा असे त्यांना बोलायचे असेल असे सांगत चंद्रकात पाटील यांची बाजू सावरली.

- Advertisement -

तसेच सध्या महाराष्ट्रात सीमा प्रश्न सुरु आहे तो सुटाला पाहिजे. महाराष्ट्रात असंतोष पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातून बाहेर पडण्यासाठी अनेक गावे मागणी करू लागली असून हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही, अशा गावांकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली. तर शिवसेनेकडे नेतेच उरलेले नसल्याने सुषमा अंधारेना पक्षात घेतले त्या टीका करण्यात एक्स्पर्ट आहेत. टीका करायला हरकत नाही मात्र त्यांनी सारखी टीका करू नये असा सल्ला दिला. शिवसेना आणि वंचित एकत्र आले तरी महायुतीला काही फरक पडणार नसल्याचा दावा त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -