Coronavirus: महाराष्ट्राच्या ‘त्या’ दाम्पत्याने जिंकली करोनाविरोधातील लढाई

९ मार्च रोजी करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.

corona virus
प्रातिनिधिक छायाचित्र

करोना विषाणू रोज्यात थैमान घालत आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. राज्य सरकार आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. राज्यात सर्वात आधी करोनाची लागण झालेल्या दाम्पत्य करोना मुक्त झाले असून त्यांची प्रकृती ठणठणीत झाली आहे. दरम्यान, त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे. याबातची माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

महाराष्ट्रातील पहिले करोनाबाधित रुग्ण हे एक दाम्पत्य होते. ९ मार्च रोजी करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. हे दाम्पत्य वीणा ट्रॅव्हल्समार्फत १ मार्चला दुबईवरुन आले होते. त्यांना ६ मार्चपर्यंत करोनाची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. मात्र, ९ मार्च रोजी पत्नीला कोरोनाची लक्षणे दिसू लागली. त्यामुळे त्यांनी तपासणी केली. दोघांच्या तपासणीत ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर तातडीने त्यांना पुण्याच्या नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले.


हेही वाचा – Breaking: अखेर शिवराजसिंह चौहान पु्न्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले


या दाम्पत्यावर १४ दिवस उपचार केल्यानंतर आज अखेर या दाम्पत्यांनी करोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. दोघांची तपासणी केली असता कोरोना निगेटीव्ह असल्याचे समोर आले. दरम्यान, या दाम्प्त्याच्या संपर्कात आल्याने त्यांच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाली होती. या मुलीवरही नायडू रुग्णालयात उपचार सुरु असून तिचीदेखील प्रकृती स्थिर आहे.