घरमहाराष्ट्र१० हजारांची तातडीची मदत,अन्नधान्य खरेदीसाठी ५ हजार

१० हजारांची तातडीची मदत,अन्नधान्य खरेदीसाठी ५ हजार

Subscribe

पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा

राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्यांना राज्य सरकारकडून सोमवारी मदतीची घोषणा करण्यात आली आहे. ज्या घरांमध्ये आणि दुकानात पाणी शिरले त्यांना १० हजार रुपयांची तातडीची मदत, तर अन्नधान्य खरेदीसाठी ५ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत विजय वडेट्टीवार यांनी महत्वाच्या निर्णयाची घोषणा केली. अलमट्टी धरणाच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र अधिकारी नेमला आहे. महाड आणि चिपळूणमध्ये 30 फुटापर्यंत पाणी होते. दरडी कोसळल्यामुळे मृतांची संख्या वाढली आहे. लोकांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. सांगलीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची स्वतंत्र यंत्रणा उभी केली जाणार. एनडीआरएफच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात तुकड्या तयार करणार असल्याची माहितीही यावेळी वडेट्टीवार यांनी दिली.

- Advertisement -

पूरग्रस्तांना 2019च्या जीआर प्रमाणे पूरग्रस्तांना मदत दिली जाणार आहे. 2019 मध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात महापूर आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आणि केंद्राचे सर्व नियम बाजूला ठेवत पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता. फडणवीसांच्या काळातील त्या जीआरप्रमाणेच राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत दिली जाईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

राज्यातील 8 ते 9 जिल्ह्यांत महापुराने थैमान घातले आहे. चिपळूण, महाड आदी ठिकाणी अनेकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरले होते. सांगली आणि कोल्हापुरात अद्यापही घरांमध्ये, रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घरातील सर्व साहित्य, दुकानातील सामान पूर्णत: वाया गेले आहे. तर पुराने बाधित झालेल्या कुटुंबांना 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, 5 किलो तूरडाळ, 5 लिटर केरोसीन मोफत देण्यात येणार आहे, अशी घोषणा यावेळी अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -