घरताज्या घडामोडीMaharashtra Mini Lockdown: 'या' भीतीमुळे फेब्रुवारीपर्यंत निर्बंधात शिथिलता नाही - राजेश टोपे

Maharashtra Mini Lockdown: ‘या’ भीतीमुळे फेब्रुवारीपर्यंत निर्बंधात शिथिलता नाही – राजेश टोपे

Subscribe

राज्यात ९० टक्के लोकांनी कोरोना प्रतिबंधित लसीचा पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस घेतलेले ६२ टक्के लोक आहेत. पण ही टक्केवारी देशाच्या सरासरीपेक्षा थोडी कमी आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांचा आकडा वाढला तर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढण्याची भीती आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापर्यंत कोरोना निर्बंधात शिथिलता आणता  येणार नाही, असा खुलासा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी केला.

शाळांच्या बाबतीत प्रदीर्घ चर्चा झाली आहे. ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अजून पुढील १५ ते २० दिवस शाळा बंद ठेवण्यात येतील. परिस्थितीवर लक्ष ठेवून मगच शाळेच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या, गुरुवारी देशातल्या सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोनाच्या संदर्भात संवाद साधणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी आज पत्रकारांशी बोलताना राज्यातील सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली. कोरोना लसीकरणाचे प्रमाण, लसींची गरज, केंद्राकडे केली जाणारी माहिती यावर त्यांनी भाष्य केले.

- Advertisement -

सध्या लसीकरणाचे प्रमाण सरासरी साडेसहा लाख आहे. पूर्वी हे प्रमाण आठ ते दहा लाखांच्यावर होते. पण आता त्याला वेग यायला हवा. त्यासाठी जिल्हाधिकारी, आयुक्त अशा सर्वांनीच वेगवेगळ्या मार्गाने लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त केले पाहिजे. लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी सज्ज असताना लसीकरणाचे प्रमाण कमी होणे चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात ९० टक्के लोकांनी कोरोना प्रतिबंधित लसीचा पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस घेतलेले ६२ टक्के लोक आहेत. पण ही टक्केवारी देशाच्या सरासरीपेक्षा थोडी कमी आहे. आज १५ ते १८ वयोगटाला लस देण्याचा टप्पा ३५ टक्के गाठला आहे. एकूण ६० लाखांपर्यंतचा हा वयोगट आहे. यामध्ये हाच वेग राहिला तर येत्या आठ ते दहा दिवसात या वयोगटाचे लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

कोरोना रुग्णांना १५० मे. टन ऑक्सिजन

सध्या कोविड आणि नॉन कोविड रुग्णांकडून ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी होत आहे. फक्त कोरोना रुग्णांसाठी जेव्हा दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासेल तेव्हा आपोआप लॉकडाऊन लागेल. मात्र, सध्या २५० मेट्रिक टन ऑक्सिजन हा नॉन कोविड रुग्णासाठी तर १५० मेट्रिक टन ऑक्सिजन हा कोविड रुग्णांसाठी अशी एकूण ४०० मेट्रिक टन  ऑक्सिजनची गरज भासत असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, कोरोना प्रतिबंधित उपाय म्हणून तोंडावरमास्क लावू नये असे सांगणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लसीकरण हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. त्यात कोणी अडथळा आणू नये, असे टोपे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णवाढ

गेल्या एक दोन दिवसात राज्यात कोरोना रुग्णसंख्या स्थिरावताना दिसत असली तरी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढेल, असा अंदाज असे सार्वजनिक आरोग्य विभागाने बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वर्तवला. आरोग्य विभागाच्या या माहितीवर मंत्रिमंडळाने चिंता व्यक्त केली. एक दोन दिवसांच्या कमी रुग्ण संख्येवरून बेसावध राहू नका. जिल्हा प्रशासनांनी लसीकरण वाढवावे आणि सुविधा तयार ठेवाव्या, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्या. युके, अमेरिका या देशातही आता रुग्णालयांमध्ये संख्या वाढून ताण यायला सुरुवात झाली आहे, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येत मोठी भर, एकूण संख्या पोहोचली ७० लाखांवर!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -