घरताज्या घडामोडीसीएसएमटी पुनर्विकास प्रकल्पाची पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी

सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्पाची पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी आज मुंबई येथे एका कार्यक्रमात रिमोटद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासासाठी 1813 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी आज मुंबई येथे एका कार्यक्रमात रिमोटद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासासाठी 1813 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसेच, दक्षिणेकडील हेरिटेज परिसर जिथून प्रवासी उपनगरीय गाड्यांमध्ये चढतात तेथून उत्तरेकडील उपनगरीय क्षेत्र आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचा प्रवेश असे आणखी दोन प्रवासी बोर्डिंग एरिया उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. (Foundation laying of CSMT Redevelopment Project by Prime Minister Modi)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची आधुनिक यंत्रणा आणि वेगवेगळे आगमन आणि निर्गमन, लिफ्टस्, एस्केलेटर्स, प्रवासी इत्यादी सुविधा वाढवण्यासह मेट्रो लाईन क्र-3 सह एकीकृत असेल. जगप्रसिद्ध आयकॉनिक संरचना आपल्या भूतकाळातील वैभवासाठी संपूर्ण स्थानकावरील डिझाइन दृष्टिकोनाची एकसमानता आणि संवर्धन तसेच पूर्ववत करण्यासाठी पुन्हा डिझाइन केले जाईल.

- Advertisement -

पुनर्विकासाची काही ठळक वैशिष्ट्ये :

  • प्रतिष्ठित स्टेशन इमारत, हेरिटेज वास्तूचा विस्तार आणि संवर्धन.
  • किरकोळ, कॅफेटेरिया, इमारतींच्या सर्व बाजूंना आणि सर्व प्लॅटफॉर्मला जोडणार्‍या मनोरंजनाच्या सुविधांसाठी मोकळी जागा असलेल्या प्लॅटफॉर्मवर प्रशस्त दुहेरी स्तरावरील उपनगरी कॉन्कोर्स आणि लांब-पल्ल्याचा कॉन्कोर्स.
  • आगमनासाठी फूट ओव्हर ब्रिजेस, स्कायवॉक कनेक्शन
  • एकापेक्षा जास्त प्रवेशस्थान आणि सर्व बाजूंनी स्टेशनवर प्रवेश करण्याची सोय.
  • सध्याच्या दक्षिणेतील गर्दी कमी करुनआणि पार्किंगची पुरेशी सुविधा.
  • गोंधळ मुक्त प्लॅटफॉर्म, सुधारित पृष्ठभाग, सर्व ट्रॅकसह प्लॅटफॉर्मवर संपूर्ण आच्छादित आर्केड
  • दिव्यांगजनांसाठी सुविधा.
  • प्रवाशांना आराम – रोषणाई, मार्ग शोधणे/चिन्ह
  • सुरक्षितता – सीसीटीव्ही, प्रवेश नियंत्रणांची तरतूद
  • प्रमाणित हरित इमारती – सौरऊर्जा, जलसंवर्धन/पुनर्वापर, मलनिस्सारण प्रक्रिया संयंत्र, घनकचरा व्यवस्थापन.

हेही वाचा – तुम्ही दहा पावलं चाला मी अकरा पावलं चालतो; पंतप्रधान मोदींची फेरीवाल्यांना साद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -