घर ताज्या घडामोडी यंदा गणेशोत्सवात घरगुती स्तरावर शाडू मातीची पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती बंधनकारक

यंदा गणेशोत्सवात घरगुती स्तरावर शाडू मातीची पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती बंधनकारक

Subscribe

सन २०२३ च्या गणेशोत्सवात घरगुती स्तरावरील गणेशोत्सवासाठी ४ फूटापर्यंत उंची असणा-या मुर्त्या या केवळ शाडू माती आणि पर्यावरणपूरक घटकांपासून घडविलेल्या असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार करण्यात येणा-या मूर्तींवर घरगुती गणेशोत्सवासाठी प्रतिबंध असणार आहे.

मुंबई : सन २०२३ च्या गणेशोत्सवात घरगुती स्तरावरील गणेशोत्सवासाठी ४ फूटापर्यंत उंची असणा-या मुर्त्या या केवळ शाडू माती आणि पर्यावरणपूरक घटकांपासून घडविलेल्या असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार करण्यात येणा-या मूर्तींवर घरगुती गणेशोत्सवासाठी प्रतिबंध असणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पर्यावरणपूरक श्रीगणेश मूर्ती घडविणा-या मूर्तीकारांना शाडू माती व महापालिकेच्या प्रत्येक विभागात एका ठिकाणी मोफत जागा शोधून उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी पालिका परिमंडळीय सह आयुक्त / उपायुक्तांना गुरुवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडलेल्या बैठकीदरम्यान दिले. (Ganeshotsav mandatory eco friendly Lord Ganesha idol made Shadu soil household level)

मुंबई नगरीची महत्त्वाची सांस्कृतिक ओळख असणारा श्री गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी मुंबई महापालिका सातत्याने विविध स्तरिय प्रयत्न करीत असते. येत्या सप्टेंबरमध्ये येणा-या श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश विचारात घेऊन पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न पालिकेकडून केला जात आहे.

- Advertisement -

गेल्यावर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान ज्या गणेशोत्सव मंडळांची शुल्क व अनामत रक्कम जमा असेल, त्यांना ती पुढील ७ दिवसांच्या आत परत करण्याचेही निर्देश महानगरपालिका आयुक्त महोदयांनी आजच्या बैठकीदरम्यान दिले आहेत.

या विशेष बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रभारी) (पश्चिम उपनगरे) रमेश पवार, सह आयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे यांच्यासह सर्व परिमंडळांचे सह आयुक्त / उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख आणि महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.


- Advertisement -

हेही वाचा – गद्दारांच्या साथीने मुंबई जिंकण्याचे दिवास्वप्न, काँग्रेसची जे. पी. नड्डा यांच्यावर टीका

- Advertisment -