घरताज्या घडामोडीकायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर...गोपिचंद पडळकर यांचा इशारा

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर…गोपिचंद पडळकर यांचा इशारा

Subscribe

तुम्ही हे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न करताय?

मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान, आम्ही सगळे कायद्याच्या राज्यात राहतो आणि आम्ही कायद्याने चालणारे कार्यकर्ते आहोत. लोकशाहीच्या माध्यमातून आमचा जो काही अधिकार आहे. त्या अधिकारानुसार आम्ही शांततेत आंदोलन करत होतो. परंतु पोलीस बळाचा वापर करत आमचं आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आला. त्यामुळे मी सरकारचा जाहीर निषेध करतो. असं भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

तुम्ही हे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न करताय?

एसटी कर्मचाऱ्यांना एकदा हा प्रश्न विचारून बघा की, हे आंदोलन आम्ही चिघळण्याचा प्रयत्न करतोय का?, किंवा त्यांची माती आम्ही भडकावण्याचा प्रयत्न करतोय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. परंतु आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये अनिल परब यांच्या घरी जाणार आहोत. एसटी कर्मचाऱ्यांचा अंत सरकारने बघू नये, आता अकरा दिवस या आंदोलनाला पूर्ण झाले. तसेच सरकार सुद्धा या विषयावर बोलायला तयार नाही. माझी सरकारला एकच विनंती आहे की, या आंदोलनामध्ये सरकारने लक्ष दिलं पाहीजे नाहीतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. तर सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची राहणार असल्याचं गोपिचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

सरकारने ठामपणे विलिनीकरणाची भूमिका स्पष्ट करावी

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या आता वाढत चालल्या आहेत. यावर सरकारने ठामपणे लक्ष द्यायला पाहिजे. परंतु सरकार यावर काही लक्ष द्यायला तयार नाहीये. आम्हाला कोणत्याही प्रकारचं आमंत्रण आलेलं नाहीये. तसेच आम्हाला आमंत्रण किंवा निमंत्रणाची गरज सु्द्धा पडणार नाही. सरकारने ठामपणे विलिनीकरणाची भूमिका स्पष्ट करावी.

कुठलाही विषय चर्चेशिवाय मिटत नाही. तसेच कुठल्याही आंदोलनावर तोडगा निघाल्याशिवाय चर्चा संपत नाही. आम्ही पहिल्यादिवसापासून राज्य सरकारला मदत करायला तयार आहोत. पण सरकार यावर कुठलीही ठाम भूमिका घेत नसून झोपेचं सोंग करत आहे. त्यामुळे सरकार आमच्यावर आरोप करत आहेत. परंतु सरकार तयार असेल तर त्यासाठी आम्ही चर्चा करायला तयार आहोत. एसटी कर्मचाऱ्यांची नाळ ही सर्वांसोबत जोडलेली आहे. त्यामुळे सर्वत आमदार आणि मंत्र्यांनी या एसटीमधून प्रवास केला आहे. त्यामुळे खाजगीकरण करणे खूप अवघड असल्य़ाचं गोपिचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

आजची रात्र आम्ही या आंदोलकांसोबत घालवणार आहोत. कारण या आंदोलनाला महाराष्ट्रातून चांगल्या प्रकारे आणि उत्फुर्तपणे पाठिंबा मिळत आहे. आज अकरा दिवस होऊनही संपूर्ण मैदान आंदोलकांनी भरलेलं आहे. या आंदोलनामध्ये सरकारला वाटतंय की, मी आंदोलन मोडीत करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु निलंबनाची आणि सेवासमाप्तीची नोटीस यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस बळाचाही वापर केला परंतु कर्मचारी दिवसागणिक वाढत आहेत. मात्र, हजारो कर्मचाऱ्यांना पोलिसांनी रस्त्यावर थांबवून ठेवण्याचा प्रयत्न देखील केला आहे. त्यामुळे मी ठामपणाने सांगतोय की, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील एसटी कर्मचारी जागा झाला आहे. त्यांच्यावर ज्याप्रमाणे संघटनांचा राज्य सरकारकडून अन्याय केला जात आहे. त्याचप्रमाणे सर्व मोठ्या संख्येने एकत्रित आले असून उद्या यापेक्षाही मोठ्या संख्येने आम्ही आंदोलन करणार आहोत. असं आवाहन गोपिचंद पडळकर यांनी दिलं आहे.


हेही वाचा: देशात Fire Boltt Al स्मार्टवॉच होणार लॉन्च, कॉलिंग आणि बॅटरीची मिळणार अफलातून सुविधा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -