घरक्राइमऑनलाइन बेटिंगच्या जाहिराती टाळण्याच्या केंद्र सरकारच्या माध्यमांना सूचना

ऑनलाइन बेटिंगच्या जाहिराती टाळण्याच्या केंद्र सरकारच्या माध्यमांना सूचना

Subscribe

सट्टेबाजी आणि जुगार नागरिकांसाठी धोकादायक आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारत सरकारने माध्यमांना ऑनलाइन सट्टेबाजी प्लॅटफॉर्मची जाहिरात करणे टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. एक एडव्हायजरी जारी करून याबाबत सुचना दिल्या आहेत.

सट्टेबाजी आणि जुगार नागरिकांसाठी धोकादायक आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारत सरकारने माध्यमांना ऑनलाइन सट्टेबाजी प्लॅटफॉर्मची जाहिरात करणे टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. एक एडव्हायजरी जारी करून याबाबत सुचना दिल्या आहेत. सट्टेबाजी आणि जुगार ग्राहकांसाठी, तरुण आणि लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे सरकारने म्हटले आहे. (Government issues advisory against ads promoting online betting)

४ डिसेंबर २०२० रोजी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने खाजगी सॅटेलाइट टीव्ही चॅनेल्ससाठी ऑनलाइन गेमिंगच्या जाहिरातींबाबत जाहिरात मानक परिषद (ASCI) मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, यासाठी एक एडव्हायजरी जारी केली होती. यामध्ये ऑनलाइन गेमिंगच्या प्रिंट आणि ऑडिओ व्हिज्युअल जाहिरातीमध्ये काय असावे आणि काय नसावे याबद्दल माहिती देण्यात आली होती.

- Advertisement -

बंदी असलेल्या बाबींचा प्रचार

दरम्यान, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल आणि ऑनलाइन मीडियावर दिसणाऱ्या ऑनलाइन बेटिंग वेबसाइट्स/प्लॅटफॉर्मच्या अनेक जाहिरातींच्या उदाहरणानंतर हा सल्ला देण्यात आला आहे. ऑनलाइन सट्टेबाजीच्या जाहिरातींमुळे बंदी असलेल्या बाबींचा प्रचार होत आहे, असेही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे.

- Advertisement -

याशिवाय, मंत्रालयाने ऑनलाइन जाहिरातीसह ऑनलाइन आणि सोशल मीडियाला अशा जाहिराती भारतात प्रदर्शित करू नयेत किंवा भारतीय प्रेक्षकांना अशा जाहिरातींसाठी लक्ष्य करू नये असा सल्ला दिला आहे.


हेही वाचा – अखेर हरकती, सुचनांवर सुनावणी न घेता प्रभाग आरक्षणावर शिक्कामोर्तब; काँग्रेस न्यायालयात दाद मागणार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -