घरताज्या घडामोडीग्रामपंचायत निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण, सुमारे 74 टक्के मतदान पूर्ण

ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण, सुमारे 74 टक्के मतदान पूर्ण

Subscribe

राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी आज सुमारे 74 टक्के मतदान पूर्ण झाले आहे. सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे आज प्रत्यक्षात 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले.

दुपारी 3.30 पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी 67 टक्के मतदान झाले होते. नक्षलग्रस्तभागात दुपारी 3.30 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. मात्र, आता 20 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल. ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या या मतदानात जनतेने नेमका कुणाला कौल दिला हे अवघ्या दोन दिवसांत कळणार आहे.

- Advertisement -

रायगड जिल्ह्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत सुमारे 70.82 टक्के मतदान पूर्ण झाले आहे. उरण येथे सर्वाधिक 77.81 टक्के मतदान झाले आहे. म्हसळा येथे 59.08 टक्के आणि धुळे जिल्ह्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत 65.90 टक्के मतदान झाले आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3.30 वाजेपर्यंत 59.08 टक्के मतदान आणि भंडाऱ्यात 64.62 टक्के मतदान झाले आहे.

हेही वाचा : राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

- Advertisement -

प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:

ठाणे – 35, पालघर – 62, रायगड – 191, रत्नागिरी – 163, सिंधुदुर्ग – 291, नाशिक – 188, धुळे – 118, जळगाव – 122, अहमदनगर – 195, नंदुरबार – 117, पुणे – 176, सोलापूर – 169, सातारा – 259, सांगली – 416, कोल्हापूर – 429, औरंगाबाद – 208, बीड – 671, नांदेड – 160, उस्मानाबाद- 165, परभणी – 119, जालना – 254, लातूर – 338, हिंगोली – 61, अमरावती – 252, अकोला – 265, यवतमाळ – 93, बुलडाणा – 261, वाशीम – 280, नागपूर – 234, वर्धा – 111, चंद्रपूर – 58, भंडारा – 304, गोंदिया – 345, गडचिरोली- 25. अशा एकूण  7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

राज्यात अहमदगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड,भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदूरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, वर्धा, ठाणे, वाशिम, यवतमाळ, नांदेड, नाशिक या जिल्ह्यातील एकूण 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी निवडणूका पार पडल्या आहेत.


हेही वाचा : अजित पवारांच्या तोंडून खोक्यांची भाषा शोभत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -