घरताज्या घडामोडी'संशय आणि आरोपावरुन एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करणे चुकीचे'

‘संशय आणि आरोपावरुन एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करणे चुकीचे’

Subscribe

पूजा चव्हाण प्रकरणावरुन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला टोला लगावला आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. या प्रकरणांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवली आहे. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येला शिवसेनेचे नेते संजय राठोड जबाबदार असल्याचे बोले जात आहे. तसेच विरोधकांकडून संजय राठोड दोषी असल्याचेही बोले जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडून राजीनामा घ्यावा, अशी एकच मागणी जोर धरु लागली आहे. तसेच विरोधकांकडून देखील टीका केल्या जात आहेत. यावर आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘संशय आणि आरोपावरुन एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करणे चुकीचे आहे’, अशी प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी दिली आहे. मंगळवारी नगर येथे माध्यमांशी बोलताना ते बोलत होते.

काय म्हणाले मुश्रीफ?

पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूबाबत मुश्रीफ म्हणाले की, ‘केवळ संशय आणि आरोपावरुन एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करणे चुकीचे आहे. आता या प्रकरणातील सत्यही लवकरच बाहेर येईल’.

- Advertisement -

भाजपच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ED लागते

‘भाजपाच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडीची चौकशी लावण्यात येते’, असा आरोप हसन मुश्रीफ यांनी भाजपवर केला आहे. विशेष म्हणजे ईडीमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे. याआधी असे राजकारण कधीही झाले नव्हते. विरोधातील आवाज दाबून टाकण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे राज्य सरकार आता ईडी आणि सीबीआयच्या चौकशीबाबत कायदा करणार असल्याचे देखील ते पुढे म्हणाले.


हेही वाचा – मुंबईकरांनो सावध व्हा! ‘ही’ आहे धोक्याची घंटा

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -