घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअवघ्या १३५० रुपयांसाठी मुख्याध्यापक व शिक्षिका गजाआड

अवघ्या १३५० रुपयांसाठी मुख्याध्यापक व शिक्षिका गजाआड

Subscribe

नाशिक : शहरातील सोयगाव नववसाहत भागातील जागृती माध्यमिक विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचार्‍याला घरभाडे भत्ता लागू करण्यासाठी एक हजार तीनशे पन्नास रुपयांची लाच मागणार्‍या मुख्याध्यापक राहुल मोरणकरसह उपशिक्षिकेला अटक करण्यात आली. ठरलेल्या रकमेपैकी १२५० रुपये मुख्याध्यापकाच्याच कार्यालयात स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात असून, बुधवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने विद्यालयातच ही कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

जागृती विद्यालयात शिपाई पदावर कामाला असलेल्या कर्मचार्‍याला सोयगाव महानगरपालिकेत समाविष्ट झाल्याने पगारात वाढ होऊन घरभाडे भत्ता लागू करण्याचा प्रस्ताव होता. यासाठी मुख्याध्यापक राहुल प्रकाश मोरणकर आणि उपशिक्षिका मनीषा चव्हाण यांनी एक हजार ३५० रुपयांची लाच मागितली. मुख्य म्हणजे, मुख्याध्यापक मोरणकर यांनी संबंधित शिक्षिकेला ही रक्कम घेण्याची जबाबदारी दिली होती. मात्र, संबंधित शिपायाने याबाबत नाशिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचण्यात येऊन मुख्याध्यापक कार्यालयातच रक्कम स्विकारताना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले.

- Advertisement -

ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक-परिक्षेत्र एन. एस. न्याहळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक सतीश डी. भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साधना भोये -बेलगावकर, हवालदार सचिन गोसावी, चंद्रशेखर मोरे यांनी केली. याप्रकरणी मुख्याध्यापक मोरणकर व उपशिक्षिका चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -