घरताज्या घडामोडीचीनमधला नवा व्हेरियंट महाराष्ट्रात आढळला नाही; केंद्राकडून सतर्कतेचे आदेश, आरोग्यमंत्र्यांची माहिती

चीनमधला नवा व्हेरियंट महाराष्ट्रात आढळला नाही; केंद्राकडून सतर्कतेचे आदेश, आरोग्यमंत्र्यांची माहिती

Subscribe

चीनमधला नवा व्हेरियंट महाराष्ट्रात आढळला नाही. कोविडचा डोस१, डोस२ आणि ६० वर्षांवरील बुस्टर डोस सुद्धा ६० ते ६५ टक्के लोकांना देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. केंद्राने सर्व राज्य सरकारना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रभाव वाढण्यास कारणीभूत ठरलेला नवा कोरोना व्हेरियंट BF.7 चा भारतात शिरकाव झाला आहे. देशात या व्हेरियंटचे विविध राज्यांमध्ये चार रुग्ण आढळून आले आहेत, पण महाराष्ट्रात एकही रूग्णाचा समावेश नाही, केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यांना काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

पीएसी सेंटर, तालुका, जिल्हा आरोग्य केंद्र, मेट्रो सिटी आणि महापालिकेतील आरोग्य विभागाला टेस्टिंग , ट्रॅकिंग, ट्रीटमेंट आणि व्हॅक्सिनेशन या चार प्रक्रियांबाबत सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा पद्धतीच्या बातम्या आल्यानंतर नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण शासन, प्रशासन निर्णय घेण्यासाठी सतर्क आहे. आपली यंत्रणा पूर्णपणे तयार आहे. आरोग्याच्या रिक्त पदासाठी प्रत्येक जिल्हापातळीवर जाहिराती प्रसिद्ध करण्यात येत आहेत. तसेच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. उद्या केंद्रीय मंत्र्यांसोबत एक महत्त्वाची बैठक होईल. त्यानंतर आम्हाला अंतिम निर्णय दिले जातील, असं तानाजी सावंत म्हणाले.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सज्जतेचे तसेच नव्या आणि उदयाला येणाऱ्या कोविड-19 व्हेरियंटच्या प्रतिबंधासाठी सज्ज राहण्याचे आणि दक्ष राहण्याचे निर्देश दिले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यापूर्वीच जून 2022मध्ये कोविड-19 संदर्भात सुधारित मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. यामध्ये वेळेवर निदान, विलगीकरण, चाचणी आणि संशयित तसेच आजाराची पुष्टी केलेल्या रुग्णाचे योग्य व्यवस्थापन यांचा समावेश आहे. या सर्वांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : BF.7ची तीन प्रकरणे आढळली, सर्व विमानतळांवर प्रवाशांचे आजपासून रँडम सॅम्पलिंग


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -