कोकणात पुढील चार दिवस पावसाचे धुमशान; हवामान विभागाचा इशारा

मुंबईसह राज्यभरात आता मान्सून (Monsoon) सक्रीय झाला असून, मुसळधार पावसाला (Heavy Rainfall) सुरूवात झाली आहे. मंगळवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. अशातच आता पुढील ३ ते ४ दिवस कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Regional Meteorological Centre Mumbai issues weather warning for the next 5 days for Maharashtra.
मुंबईसह 'या' जिल्ह्यांत पुढील पाच दिवस मुसळधार, IMD कडून सतर्कतेचा इशारा 

मुंबईसह राज्यभरात आता मान्सून (Monsoon) सक्रीय झाला असून, मुसळधार पावसाला (Heavy Rainfall) सुरूवात झाली आहे. मंगळवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. अशातच आता पुढील ३ ते ४ दिवस कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, मुंबईत बुधवारी संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचाही इशारा हवामान विभागाने (IMD) दिला आहे. (Heavy Rainfall Alert In Konkan also yallow alert in mumbai and thane)

मुंबई, ठाण्यात (Mumbai and Thane) पुढील २ दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून, मुंबईत बुंधवारी संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढणार आहे. परिणामी उद्यापासून मुंबई, ठाण्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे.

हेही वाचा – कुर्ला इमारती दुघर्टनेतील मृतांचा आकडा 17 वर, बंडखोर आमदार कुडाळकरांकडून मृतांना आर्थिक मदत जाहीर

मुंबई आणि ठाण्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही उद्यापासून पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकणात चांगल्या पावसाची शक्यता आहे. तसेच, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शहरी भागासह महाराष्ट्रातील घाट माथ्यांवरही पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे इथेही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबईत पावसाने हजेरी लावली असून, या मुसळधार पावसामुळे कुर्ला येथील नाईक नगर सोसायटी येथील जिल्हाधिकारी यांच्या जागेवरील ४० – ५० वर्षे जुन्या धोकादायक इमारतींपैकी २ चार मजली इमारती सोमवारी रात्री ११.४० वाजताच्या सुमारास अचानक कोसळल्या. या दोन पैकी एक इमारत पूर्णपणे कोसळली तर दुसऱ्या इमारतीचे दोन मजले कोसळले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७ हून अधिक जखमी आहेत, यातील काही जणांवर राजावाडी आणि सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – राज्यात सत्तासंघर्षात जितेंद्र आव्हाड यांचे सिनेसृष्टीत पदार्पण; व्हिडीओ केला शेअर