पुढील ३-४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

मुंबईसह राज्यभरात पावसाने मागील काही दिवसांपासून हजेरी लावली आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (सोमवारी) सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आता हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

there is possibility of heavy rains in Maharashtra

मुंबईसह राज्यभरात पावसाने मागील काही दिवसांपासून हजेरी लावली आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (सोमवारी) सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आता हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Heavy Rainfall In Ratnagiri and Sindhudurg district prediction of IMD)

हवामान विभागाच्या माहितीनुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्गात आता पुढील ३ ते ४ तास मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. (Ratnagiri Sindhudurg Heavy Rain) दुपारी २.४५ च्या उपग्रह निरीक्षणातून असे दिसून येत असल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे. याबाबत हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत माहिती दिली.

“या पावसाचा रायगड जिल्ह्याला फटका बसण्याची दाट शक्यता आहे. तसेच, मुंबई आणि ठाण्यात अंशतः ढगाळ वातावरण असेल. घाट भागातही पावसाच्या काही तीव्र सरींसाठी वातावरण अनुकूल दिसत आहे”, असा अंदाजही यावेळी हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

दक्षिण कोकणमध्ये मुसळधार पाऊस तर उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल, अशी शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती. तसेच, राज्याच्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला होता.

पुढील पाच दिवस पाऊस राहील, असे हवामान खात्याने सांगितल्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडावे, अशा सुचनाही देण्यात आल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याकडून (IMD) राज्यात पुढील पाच दिवस पाऊस होणार, असा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार राज्यातील काही भागात पाऊस झाला.


हेही वाचा – अमित ठाकरेंकडून ‘मनविसे’ची पुनर्बांधणी; विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर