घरमहाराष्ट्ररत्नागिरीत पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरीत पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

Subscribe

रत्नागिरीतील चिपळूण, संगमेश्वर आणि गुहाघरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रत्नागिरीतील चिपळूण, संगमेश्वर आणि गुहाघरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाली आहे. खेडमधील गेल्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नारंगी नदीने रौद्र रुप धारण केले आहे. पावसामुळे २५ गावांचा संपर्क तुटला आहे. परशुराम घाटात दरड कोसळली असून दरड हटवण्याचे काम सुरु आहे.

रत्नागिरीतील मुसळधार पावसाने केली नागरिकांची दैना

रत्नागिरीतील मुसळधार पावसाने केली नागरिकांची दैना

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಜುಲೈ 14, 2019

- Advertisement -

मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

खेड तालुक्यातील सततच्या पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग पाण्याखाली गेल्याने हा महामार्ग बंद ठेवण्यात आला असून त्यावर सुरक्षारक्षक आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्याशिवाय दापोली मार्गही बंद करण्यात आला असून खेडच्या बाजारपेठेत आणि घरांमध्ये पाणी शिरले आहे. वाशिष्ठी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली असून गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीत सुरू असलेला पाऊस आणि साताऱ्या जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. जगबुडीची पाणी पातळी ६.५० मीटर असून इशारा पातळी ६.०० मीटर एवढी आहे. जगबुडी नदीने आज सकाळी ९.३० वाजता ७.१० मीटरची पातळी गाठून इशारा पातळीही ओलांडल्याने खेडची रस्ते वाहतूक बंद करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई-गोवा महामार्ग आणि दापोली मार्गही बंद करण्यात आला आहे. खेड बाजारपेठेतही पाणी शिरल्याने बाजारपेठही बंद ठेवण्यात आली आहे. बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी घुसल्याने व्यापारी आणि छोट्या दुकानदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे सह्याद्री खोऱ्यातील ३२ गावांचा संपर्क तुटला आहे.

हेही वाचा –

इंग्लंडच्या विजयावर दिग्गजांनी आयसीसीला विचारले प्रश्न

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’नंतर आता पोलीस विभागसुद्धा महापालिकेच्या डिफॉल्टर यादीत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -