घरठाणेठाण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी

ठाण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी

Subscribe

राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईसह ठाण्यात सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झालं आहे. गणेशोत्सवाची लगबग आणि धामधूम सुरू असताना पावसाने हजेरी लावल्यामुळे भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यभरात थोडी उसंत घेतली होती. तसेच दोन दिवसांपासून कडक ऊन पडल्यामुळे ठाणेकर हैराण झाले होते. परंतु आज(बुधवार) अचानक वातावरणात बदल झाला आणि पावसाला सुरूवात झाली. ठाण्यातील रस्ते जलमय झाल्यामुळे सर्वसामन्यांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे.

- Advertisement -

या मुसळधार पावसामुळे ठाण्यात मोठ्या प्रमाणात काळोख पडला होता. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त विनाकारण घराबाहेर पडू नये, असा इशारा देण्यात आला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे परिसरात आणि वातावरणात थंडावा पसरला आहे.

- Advertisement -

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे उद्यापासून राज्यात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टी तसेच विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


हेही वाचा : मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण; विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -