एकनाथ शिंदे आदरणीय होते आणि राहतील, पण…, दिपाली सय्यदकडून भाजपला इशारा

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Shivsena leader Deepali Sayyed) यांनी आता शिंदे गट आणि भाजप नेत्यांना धमकीवजा इशारा दिला आहे.

deepali sayyed

नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात सत्तांतर घडल्याने शिवसेनेचे नेते आता जास्त सक्रीय झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर शिंदे गटाने नेत्यांनी आरोप केल्याने शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहेत. दरम्यान, शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Shivsena leader Deepali Sayyed) यांनीही आता शिंदे गट आणि भाजप नेत्यांना धमकीवजा इशारा दिला आहे. (Deepali Sayyed tweet against bjp)

हेही वाचा – ठाकरे-शिंदे जोडी राम-लक्ष्मणाची, रामराज्याचा संघर्ष सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल; दिपाली सय्यद यांचे ट्विट

मला माननीय एकनाथ शिंदे साहेब कालही आदरणीय होते, आजही आदरणीय आहेत आणि उद्याही राहतील. पण शिवसेनेच्या आमदारांना ढाल समजून किरीट सोमय्या आणि भाजपचे अन्य दोन वाचाळवीर आदरणीय उद्धव साहेब आणि शिवसेनेवर टीका करतील तर त्यांना एवढंच सांगेन की आमच्यातील शिवसेना आजही जिवंत आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, उगाच कळ काढू नका. आदरणीय शिंदे साहेबांनी भाजपवर दाखवलेल्या विश्वासाला तडा देऊ नका. भाजप आमची शत्रू नाही आणि त्यांच्या विरुद्ध आम्हाला बोलण्यास आनंदही नाही परंतु वाचाळविरांना माफी मिळणार नाही. भविष्यात काय होईल माहित नाही, पण भाजपने याची दखल घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा – राजसाहेब, लवकर बरे व्हा नाहीतर फडणवीस एकटे पडतील, दिपाली सय्यदांचा राज ठाकरेंना टोला

एकूणच त्यांच्या या ट्विटमधून त्यांनी भाजप नेत्यांना निशाण्यावर घेतलं आहे. भाजपकडून उद्धव ठाकरेंबाबत होणारी टीका पाहता त्यांनी हे ट्विट केलं असून त्यांनी यातून भाजपला इशारा दिला आहे.


दरम्यान, माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्त्वाच्या वनवासात कायम राहिल. शिवसैनिकांनो रडायचे नाही लढायचे. आपले मत शिवसेनेला कायम राहिल. हा रामराज्याचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल, असं ट्विट काही दिवसांपूर्वी दिपाली सय्यद यांनी केलं होतं.