घरमहाराष्ट्रपूरग्रस्त महिलांसाठी १० हजार सॅनिटरी पॅडची मदत

पूरग्रस्त महिलांसाठी १० हजार सॅनिटरी पॅडची मदत

Subscribe

पूरग्रस्त महिलांसाठी राज्य महिला आयोगाकडून १० हजार सॅनिटरी पॅड आणि २ हजार अॅडल्ट डायपर देण्यात आले आहेत.

कोल्हापुर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती निवळली असून सध्या स्वयंसेवक आणि सरकारकडून या परिसराची स्वच्छता सुरू आहे. पुरात कपड्यांचा चिखल झाला आहे. तर भिजलेल्या कपड्यांचा धुवूनही वापर करू शकत नाही, असे येथील मदत करणारे सांगतात. त्यानुसार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत राज्य महिला आयोगाने मोठ्या प्रमाणावर सॅनिटरी नॅपकीन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी डायपर पाठवण्याची सोय केली आहे.

२ हजार अॅडल्ट डायपरची मदत

पूर परिस्थितीचा सामना करणाऱ्या महिला, वृद्ध यांच्या आरोग्याचा विचार प्रामुख्याने करण्यात आला असल्याचे सांगत राज्य महिला आयोगाकडून या जिल्ह्यात १० हजार सॅनिटरी पॅड, २ हजार अॅडल्ट डायपर देण्यात आले असल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली. पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य, कपडे मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्यांमध्ये पोहचत आहे. पण, आता पूर ओसरल्यानंतर आरोग्याच्या काळजीच्या दृष्टीने सॅनिटरी नॅपकिन्स तसेच वृद्धांकरिता अॅडल्ट डायपरची गरज भासू शकते. याचा विचार करुनच मदत स्वरुपात या गोष्टी आयोगाकडून दिल्या जात आहेत. सामाजिक स्वयंसेवी संस्था तसेच सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून पूरग्रस्तांच्या मदतीत महिला आयोग सहभागी झाले असल्याचे आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पूरग्रस्तांसाठी मुंबई विद्यापीठाचा मदतीचा हात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -