Ganesh Naik Bail : भाजप नेते गणेश नाईकांना अटकपूर्व जामीन मंजूर, हायकोर्टाचा मोठा दिलासा

High Court grants pre-arrest bail of Ganesh Naik against rape allegation

भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. परंतु हायकोर्टाच्या निर्णयामुळे गणेश नाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेश नाईक यांच्यावर महिलेकडून अत्याचार आणि बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला होता. गणेश नाईक यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली. अटकपूर्व अर्जावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

भाजप आमदार गणेश नाईक यांना हायकोर्टाने 25 हजारांच्या हमीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. गणेश नाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी गणेश नाईक यांचे अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने शनिवारी फेटाळला होता. हायकोर्टात गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली होती. यावेळी न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. आरोप झाल्यानंतर गणेश नाईक समोर आले नाहीत. परंतु अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर माध्यमांसमोर येऊन ते आपली प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे.

गणेश नाईक यांच्यावरील आरोप कोणते?

दीपा चौहान नावाच्या तरुणीने गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या २७ वर्षांपासून गणेश नाईक माझ्या संपर्कात होते. मी माझ्या न्याय हक्कासाठी मी लढाई लढत आहे. नाईकांसोबत असलेल्या संबंधातून आम्हाला एक मुलगा आहे. मुलगा पाच वर्षांचा झाल्यावर त्याला वडील म्हणून नाव देईल असे आश्वासन गणेश नाईक यांनी दिले होते. त्यांनी कोणतीही आर्थिक मदत केली नाही. गणेश नाईक यांनी अनेकदा माझ्यावर जबरदस्ती केली आहे. लैंगिक शोषण झाला असल्याचा आरोप पीडित महिलेने केले आहे. मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली असून मुलासह मला अनेकदा धमकी देऊन घरातून बाहेर काढण्यात आले आहे. शारीरिक आणि मानसिक छळ गणेश नाईक यांनी केला असल्याची तक्रार महिलेने केली आहे.


हेही वाचा : राणा दाम्पत्याला अखेर जामीन मंजूर, सत्र न्यायालयाचा निर्णय