Defamation notice: नवाब मलिकांविरोधातील वानखेडेंच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली

HighCourt adjourned hearing on dnyandev wankhedes case against Nawab Malik
Defamation notice: नवाब मलिकांविरोधातील वानखेडेंच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी अब्रू नुकसानीचा दावा ठोकला होता. मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांविरोधात आरोप केले आहेत. ट्विट करत वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावा नवाब मलिकांनी केला आहे. तसेच वानखेडेंच्या जातप्रमाणपत्रावर मलिकांनी प्रश्न निर्माण केला आहे. यामुळे नवाब मलिकांविरोधात ज्ञानदेव वानखेडे यांनी मानहानीचा दावा ठोकला आहे. वानखेडेंच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार होती परंतु न्यायालयाने आता सुनावणी पुढे ढकलली आहे.

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडील ज्ञानदेव वानखेडेंनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांविरोधात याचिका दाखल केली आहे. मलिक यांच्याविरोधात १.२५ कोटी रुपयांचा दावा दाखल करण्यात आला आहे. हायकोर्टाने यावर २२ नोव्हेंबरला सुनावणी ठेवली आहे. सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांकडील कागदपत्रे रेकॉर्डवर घेतली आहेत. तसेच न्यायालयाने पुढील सुनावणी २२ नोव्हेंबरला घेण्यात येईल असे म्हटलं आहे.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून समीर वानखेडे यांच्याविरोधात अनेक आरोप केले आहेत. वानखेडेंचे जातप्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप केला आहे. समीर वानखेडे यांनी बनावट कागदपत्र सादर करुन शासकीय सेवेत नोकरीला लागले असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच ते जन्मापासून मुस्लिम असून त्यांच्या प्रमाणपत्रावर समीर दाऊद वानखेडे असे नाव असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

नवाब मलिक म्हणाले की, वानखेडेंनी जन्म झाल्यावर जे सर्टिफिकेट होते त्यात बोगसपणा करुन नवीन तयार केले आणि आता दाखवत आहेत. कितीही काही केले तरी बोगस सर्टिफिकेटच्या आधारावर नोकरी घेतली ती नोकरी निश्चित रुपाने जाणार आहे असे नवाब मलिक म्हणाले. मुंबई महानगरपालिकेत सगळी माहिती असून माझ्याकडे त्यांच्या शाळेचा दाखला, शाळेत दाखल होण्याचा फॉर्म असे अनेक कागदपत्र असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.


हेही वाचा : पहिल्या बायकोच्या कुटूंबाला ड्रग्ज केसमध्ये अडकवण्याची वानखेडेंनी दिली होती धमकी, मलिकांचा आरोप