घरताज्या घडामोडीपीडितेच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी - अनिल देशमुख

पीडितेच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी – अनिल देशमुख

Subscribe

हिंगणघाट घटनेतील पीडितीच्या कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरीही दिली जाईल', असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडितेच्या कुटुंबियांना दिले आहे.

‘हिंगणघाट घटनेतील युवतीचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणात निकाल लवकर लावला जाईल. तसेच पीडितीच्या कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरीही दिली जाईल’, असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडितेच्या कुटुंबियांना दिले आहे.

मृतदेह स्विकारणार नाही

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरकारी नोकरीचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबियांनी हे आश्वासन लिखित स्वरुपात द्यावे अशी मागणी केली आहे. जोपर्यंत सरकारी नोकरीचे आश्वासन लिखित स्वरुपात दिले जात नाही तोपर्यंत मृतदेह स्विकारणार नाही, अशी भूमिका घेत पीडितीच्या कुटुंबियांनी ठिय्या आंदोलन केले आहे.

- Advertisement -

मृत्यूशी झुंज संपली

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांडातील मृत्यूशी झुंज देत असलेल्या पीडितेची अखेर झुंज अपयशी ठरली आहे. आज, सोमवारी सकाळी ६.५५ मिनिटांनी तिचा मृत्यू झाल्याची माहिती तिच्यावर उपचार करणार्‍या ऑरेंज सिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. गेल्या सात दिवसांपासून पीडिती मृत्यूशी झुंज देत होती. तिच्या या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रानी हळहळ व्यक्त केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

काय आहे हिंगणघाट प्रकरण

हिंगणघाट येथे एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या तरूणीला आरोपी विकेश नगराळे यांने पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. तरुणी सोमवारी सकाळी घरून हिंगणघाटला आली होती. तिच्या मार्गावर दबा धरून बसलेल्या आरोपी विकेश नगराळे याने तिला गाडीतील पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. तरूणीने आरडाओरड केल्यानंतर आग विझवून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते.

- Advertisement -

हेही वाचा – आरोपीलाही त्याच वेदना झाल्या पाहीजेत; हिंगणघाट पीडितेच्या वडीलांची मागणी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -