घरताज्या घडामोडीस्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचे निधन

स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचे निधन

Subscribe

स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचे निधन झाले आहे. देशातले पहिले मतदार श्याम सरण नेगी यांनी वयाच्या 106 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. श्याम सरण नेगी यांच्या मतदानाने लोकशाहीची सुरूवात झाली होती. हिमाचल प्रदेशातल्या कल्पा या गावातले ते रहिवासी होते.

स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचे निधन झाले आहे. देशातले पहिले मतदार श्याम सरण नेगी यांनी वयाच्या 106 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. श्याम सरण नेगी यांच्या मतदानाने लोकशाहीची सुरूवात झाली होती. हिमाचल प्रदेशातल्या कल्पा या गावातले ते रहिवासी होते. 2 नोव्हेंबरला पोस्टल मतदान केले होते. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे त्यासाठी त्यांनी मतदान केले. (independent indias first voter shyam saran negi died)

स्वतंत्र भारतातील पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. श्याम सरण नेगी यांनी आयुष्यात 33 वेळा मतदान केले. त्यांनी बॅलेट पेपरपासून ते ईव्हीएमपर्यंतचा संपूर्ण प्रवास पाहिला.

- Advertisement -

श्याम सरण नेगी यांना मतदान केंद्रावर जाऊनच मतदान करायचे होते. मात्र त्यांची प्रकृती बिघडली त्यामुळे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून मतदानाचा फॉर्म भरून घेतला. 12 डी या फॉर्मद्वारे श्याम सरण नेगी यांनी मतदानाचा हक्क बजावला.

1 जुलै 1917 साली किन्नौर जिल्ह्यातील चिन्नी गावात ज्या गावाचे आत्ताचे नाव कल्पा आहे, तिथे नेगी यांचा जन्म झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशभरात 1952 ला मतदान झाले होते. मात्र किन्नौरसह हिमालयातल्या दुर्गम भागात 25 ऑक्टोबर 1951 मध्ये मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यावेळी श्याम सरण नेगी हे मतदान करणारे पहिले भारतीय ठरले.

- Advertisement -

ऑक्टोबर 1951 मध्ये श्याम सरण नेगी यांनी पहिल्यांदा लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये मतदान केले. त्यानंतर त्यांनी प्रत्येक निवडणुकीत मतदान केले. आत्तापर्यंत त्यांनी 33 वेळा मतदान केले.


हेही वाचा – गँगस्टर लंडा हरिकेने स्वीकारली सुधीर सुरी यांच्या हत्येची जबाबदारी, सोशल मीडियावर फेसबूक पोस्ट व्हायरल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -