घरमहाराष्ट्र"मी कधीच कुणाला खोटे आश्वासन दिले नाही...", मुख्यमंत्र्यांचे मराठा आरक्षणासंदर्भात मोठे विधान

“मी कधीच कुणाला खोटे आश्वासन दिले नाही…”, मुख्यमंत्र्यांचे मराठा आरक्षणासंदर्भात मोठे विधान

Subscribe

ठाणे : मी कधीच कुणाला खोटे आश्वासन दिले नाही, कुणाची फसवणूक केली नाही. मी आरक्षणावरून फसवणूक करणारही नाही, असे विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री आज ठाण्यात देवीच्या दर्शनाशाठी आले असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मराठा समाजातील बांधवांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, “मी शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे मला या सर्वांच्या भावना माहिती आहे. मी कुठे, कधीही आणि कोणालाही खोटे आश्वासन कधी दिलेले नाही आणि मी कोणाची फसवणूक देखील केलेली नाही. मी आरक्षणावरून फसवणूक करणारही नाही. कारण मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये आतापर्यंत जे बोललो ते केले आहे. मी दिलेला शब्द पाळला आहे. त्यामुळे मी मराठा समाजाला पूर्वीच शब्द दिलेला आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टीकणारे आणि नियमाचे आरक्षण देणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध; मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

मराठा बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नका

मराठा बांधवांच्या आत्महत्येसंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, “मराठा समजाला आरक्षण देण्याबाबत आम्ही कोणतेही खोटे काम करणार नाही. आमचे समाज हे मराठा समाजाच्या बाजूचे असून त्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. मी मराठा समाजाला शब्द दिला आहे. मी मराठा समाजातील बांधवांना आवाहन आणि विनंती करतोय की, आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नका. तुमची तुमच्या कुटुंबाला आवश्यकता आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार तुमच्या बाजूने आहे. मराठा समाजाला लाभ कसे मिळले, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.”

- Advertisement -

हेही वाचा – मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करा; सरकारी जाहिरातीवर अशोक चव्हाणांचे टीकास्त्र

काय लाभ मिळणार याचा जाहिरातीत उल्ल्खे

वर्तमान पत्रातील जाहीरात ही मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी छापला आहे, या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले, “इब्ल्यूएसचे आरक्षण आहे. इब्ल्यूएसच्या आरक्षणामध्ये बहुतांश मराठा समाज आहे. इब्ल्यूएसमध्ये मराठा समाजातील आठ टक्के आणि साडे आठ टक्के तरुण यात सहभागी होत आहेत. या जाहीरातमध्ये मराठा समाज सरकार काय काय लाभ आहेत. या सर्वांचा उल्लेख जाहीरातमध्ये केला आहे. कायद्याच्या चौकटीत बसणार आणि टीकणार आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -