घरमहाराष्ट्रखोके घेऊन गुडघे टेकले असते तर आज मी नेतेपदावर असतो, संजय राऊतांची...

खोके घेऊन गुडघे टेकले असते तर आज मी नेतेपदावर असतो, संजय राऊतांची शिंदेंवर जहरी टीका

Subscribe

ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांची आज गुरुवारी (ता. २३ मार्च) संसदीय गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली. यावरून संजय राऊत यांनी शिवसेनेवर (शिंदे गट) जहरी टीका केली आहे.

ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांची आज गुरुवारी (ता. २३ मार्च) संसदीय गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली. यावरून संजय राऊत यांनी शिवसेनेवर (शिंदे गट) जहरी टीका केली आहे. जर का मी पण खोके घेऊन गुडघे टेकले असते तर मी आजही या पदावर असतो, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही जर खोके घेतले असते अंडी गुडघे टेकले असते तर मी त्या पदावर राहिलो असतो. मला पण सांगण्यात आलं, कशाला तिथे राहताय?, काय राहिलंय?, तुम्ही या आमच्याकडे. पण मी म्हंटल थुकतो तुमच्या ऑफरवर. मी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी बेईमानी करणार नाही, या भाषेत त्यांना उत्तर दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

- Advertisement -

आम्ही स्वाभिमानी आहोत, अशी अनेक पद आम्हीओवाळून टाकतो. आम्ही निष्ठावंत आहोत. माझ्या पक्षाने मला भरपूर दिले आहे आणि जर का निष्ठा राखण्यासाठी काही जात असले तर आम्ही गमवायला तयार आहोत. पण एखाद्या पदासाठी लाचारी पत्करणारा हा संजय राऊत नाही, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर जहरी टीका केली.

बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर निष्ठेचे आणि इमानदारीचे आहेत. पदासाठी, सत्तेसाठी गुडघे टेकणाऱ्यातले आम्ही नाही. पद आज आहे, उद्या परत मिळेल. तेवढी हिंमत आमच्या पक्षामध्ये अंडी आमच्या नेतृत्वामध्ये आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

दरम्यान, शिवसेनेची (शिंदे गट) कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेच्या सदस्यांनी संजय राऊत यांची संसदीय गटनेते पदावरून हकालपट्टी करत मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभेचे खासदार गजानन कीर्तिकर यांची त्या पदावर नियुक्ती केलेली आहे.

विरोध राजकीय असतो, व्यक्तिगत नसतो
यावेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधान भवनातील भेटीवर देखील भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी वारंवार विधान भवनात जायला हवं. म्हणजे एकत्र भेटतील, चर्चा करतील. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. विरोध हा राजकीय असतो, व्यक्तिगत नसतो. कटुता संपवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. निवडणुकीत पराभव करू. विचारांची लढाई विचारांनी लढू. पण सुडाने आणि बदलाच्या भावनेने तशी कारवाई करणार असाल तर मग आम्हाला त्याच भाषेने उत्तर द्यावे लागेल.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भलेही आज बोलणे झाले असले तरी त्यांच्याकडून मिळालेल्या जखमा या न भरून निघणाऱ्या आहेत, असेही राऊत यावेळी म्हणले.


हेही वाचा – राज ठाकरे यांच्या ‘भावी मुख्यमंत्री’च्या बॅनर्सवर पत्नी शर्मिला ठाकरे म्हणाल्या…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -